जुन्नर - राष्ट्रवादीकडून इंधन दरवाढीचा मोर्चा काढून निषेध

दत्ता म्हसकर
मंगळवार, 29 मे 2018

जुन्नर : सातत्याने होणाऱ्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ जुन्नर तहसील कार्यालयावर आज (ता.29) जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश युवा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी युवक अध्यक्ष सुरज वाजगे, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, पंचायत समिती सदस्य विशाल तांबे, नगरसेवक भाऊ कुंभार, अलका फुलपगार, शहर अध्यक्ष धनराज खोत, बाळासाहेब सदाकाळ, दशरथ पवार, सुजाता डोंगरे, शोभा शिंदे, आरती ढोबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. वक्त्यांनी आपल्या भाषणात दरवाढीचा निषेध केला.

बेनके म्हणाले, पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या भडक्यामुळे दिवसेंदिवस सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. दररोजच्या दरवाढीमुळे सामान्य जनतेचे दर महिन्याचे बजेट कोलमडत आहे. इंधनाच्या दरवाढ कमी करण्यावर सोळा दिवसांपूर्वी दिलेली केंद्रिय पातळीवरील आश्वासने पोकळ ठरत आहे. सलग सोळाव्या दिवशी इंधन दरात वाढ झाली असून यामुळे शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडून गेले असून इंधन दर कमी करा अशी मागणी त्यांनी केली. तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी सुधीर वाघमारे यांनी निवेदन स्विकारले.

Web Title: rashtravadi rally against petrol price rise in junnar