राष्ट्रवादीचा गावभेट दौरा मांजरी खुर्दमध्ये

कृष्णकांत कोबल
गुरुवार, 7 जून 2018

मांजरी खुर्द - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात होणाऱ्या मेळाव्याच्या तयारीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून गावोगावी गावभेट दौरा केला जात आहे. मांजरी खुर्द (ता. हवेली) येथे नुकतेच या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

माजी आमदार अशोक पवार, बापूसाहेब पठारे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र खांदवे पाटील, तालुकाध्यक्ष नंदू काळभोर, कार्यध्यक्ष शांताराम बापू कटके, विलास कुंजीर, राजेंद्र चौधरी आदींनी यावेळी आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. 

माजी आमदार अशोक पवार म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे नेहमी शेतकरी व सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेऊन आखली जात असतात. भाजप सरकारने या माणसांचे कंबरडे मोडले आहे. एकीकडे भिमापाटस कारखान्याला पस्तीस कोटी रुपयांची मदत केली जाते, तर त्याच्याही आगोदर बंद झालेल्या यशवंतला वेळोवळी केवळ अश्वासने दिली जात आहेत. त्याचा जाब आपण प्रत्येकाने विचारण्याची वेळ आता आली आहे''.

पठारे म्हणाले,"पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला ठेऊन पक्षाच्या वर्धापन दिनी होणाऱ्या मेळाव्याला जास्तीत जास्त नागरिकांना आणण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्या पर्यंत आपण करीत असलेली धडपड पोहचविण्याची जबाबदरी आपणच पार पाडायची आहे.'' गावातून पन्नास चारचाकी वाहनातून कार्यकर्ते येणार असल्याची माहिती यावेळी संयोजकांनी दिली.

राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे जिल्हाध्यक्ष डाँ. शिवदीप उंद्रे, तालुका उपाध्यक्ष रमेश उंद्रे, प्रकाश सावंत यांनी या दौऱ्याचे संयोजन केले. दरम्यान, शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उपस्थितांनी गावच्या चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून मानवंदना दिली.

Web Title: rashtrawadi congress gavbhet daura