राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुन्नरला विजयादशमीला पथ संचलन

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

जुन्नर -  विजयादशमी उत्सवाचे निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जुन्नर शहरात पथसंचलन, शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

गणवेशातील स्वयंसेवकानी सायंकाळी शहरातून गणपती विसर्जन मार्गाने सघोष पथसंचलन केले. पथसंचलनात सर्व वयोगटातील स्वयंसेवक सहभागी झाले होते. पथसंचलनानंतर गणेश मैदानावर प्रमुख पाहुणे तात्यासाहेब गुंजाळ आणि प्रमुख वक्ते विनोद देशपांडे यांचे उपस्थितीत शस्त्रपूजन झाले.

गुंजाळ म्हणाले, आज संघ व संघाची शिकवण ही काळाची गरज आहे. संघासारखे शिस्तबद्ध संघटन जगात  नाही. समाजातील अबाल वृद्धांनी संघात सामील होण्याचे आवाहन त्यांनी केले.  

संघाचे प्रांत बौद्धिक मंडळ सदस्य विनोद देशपांडे यांनी  संघाचे आयाम, सेवा शिक्षण क्षेत्र आणि देशाची सुरक्षा याबद्दल माहिती दिली. 

विजयादशमी उत्सवासाठी जुन्नर शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, संघाचे जुन्नर तालुका पालक रवींद्रजी धारणे, उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे यावेळी उपस्थित होते. जुन्नर तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह सुनील काळे यांनी आभार मानले. 

Web Title: Rashtriya Swayamsevak Sangh sanchalan in junnar