पाण्यासाठी दापोडीकरांचा रास्ता रोको 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

जुनी सांगवी - दापोडी व परिसरात दहा दिवसांपासून अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या संतप्त रहिवाशांनी बुधवारी (ता. 5) पुणे-मुंबई मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. तसेच पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांना घेराव घातला व तातडीने हा प्रश्‍न मार्गी लावावा, अशी मागणी केली. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

""दापोडी प्रभाग पाणीपुरवठ्याचा शेवटचा टप्पा आहे. दहा दिवसांपासून गणेशनगर भाग, भाजी मंडई परिसर, हिंदू तेलगू चाळ, सोपान जाधव चाळ, गुलाबनगर आदी भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे त्यांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. 

पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसत आहे. पर्यायी व्यवस्था नाही. प्रशासन मात्र पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्‍वासन देते. प्रत्यक्षात कार्यवाही करत नाही,'' असा नागरिकांचा आरोप आहे. 

नागरिक म्हणतात.. 
हिंदू तेलगू चाळीतील पुष्पा गायकवाड म्हणाल्या, ""अपुरे पाणी येत आहे. त्यामुळे घरातील कामे होत नाहीत.'' 

भाजी मंडई परिसरातील मंगेश काटे म्हणाले, ""दहा दिवसांपासून कमी दाबाने पाणी येत आहे. कधी पाणीच मिळतच नाही. यामुळे कामाचा खोळंबा होतो.'' 

नगरसेवक म्हणतात.. 
दापोडीकरांचा पाणी प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पाणी प्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी लावावा. 
- माई काटे 

प्रशासनाकडे पाणीपुरवठ्याची मागणी केली. आम्ही आंदोलने केली आहेत. मात्र, हा प्रश्‍न जैसे थेच आहे. 
- राजू बनसोडे 

महापालिका प्रशासनाने पाणी प्रश्‍न सोडवावा, अशी आग्रही मागणी आहे. 
- रोहित काटे 

विविध ठिकाणी चार ते पाच दिवस दुरुस्तीची कामे सुरू होती. दापोडीत बेकायदा नळजोड आहेत. त्यामुळे पाणीटंचाई जाणवते. ते नियमानुसार अधिकृत करण्यासाठी नागरिक व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. बेकायदा नळजोडामुळे गळती, दुर्गंधीयुक्‍त पाण्याची समस्या वाढत आहे. प्रत्येक विभागास पाण्याचा कोटा देण्याचा प्रस्ताव आहे. 
- रामदास तांबे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका 

Web Title: rasta roko in dapodi for water