Big Breaking : राज्यात 54 दिवसांत कोरोनाचे पेशंट चौपट; जाणून घ्या मुंबई, पुण्याची अवस्था

योगीराज प्रभुणे
सोमवार, 25 मे 2020

पुणे : कोरोनाचा संसर्गाचं प्रमाण राज्यात वाढत असल्याचं दिसून येत आहे. मार्चमध्ये प्रयोगशाळेत तपासलेल्या प्रत्येक शंभरपैकी पाचवा नमूना पॉझिटीव्ह येत होता. हेच प्रमाण मेमध्ये 18 पर्यंत वाढले आहे. अवघ्या 54 दिवसांमध्ये कोरोना संसर्गाचा चार पटीने वाढला.

राज्यात कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. देशात सोमवारी (ता. 25) दुपारी साडेतीन वाजेपर्यंत एक लाख 39 हजार 928 रुग्णांची नोंद झाली होती. त्यापैकी  36 टक्के (50,231) रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. 

पुणे : कोरोनाचा संसर्गाचं प्रमाण राज्यात वाढत असल्याचं दिसून येत आहे. मार्चमध्ये प्रयोगशाळेत तपासलेल्या प्रत्येक शंभरपैकी पाचवा नमूना पॉझिटीव्ह येत होता. हेच प्रमाण मेमध्ये 18 पर्यंत वाढले आहे. अवघ्या 54 दिवसांमध्ये कोरोना संसर्गाचा चार पटीने वाढला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राज्यात कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. देशात सोमवारी (ता. 25) दुपारी साडेतीन वाजेपर्यंत एक लाख 39 हजार 928 रुग्णांची नोंद झाली होती. त्यापैकी  36 टक्के (50,231) रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. 

No photo description available.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

-  दृष्टीक्षेपात मुंबई-पुण्यातील उद्रेक
राज्यातील 50 हजार 231 पैकी 30 हजार 542 रुग्ण (61 टक्के) रुग्ण फक्त मुंबईत आहेत. पुणे जिल्ह्यात पाच हजार 682 (11 टक्के) आहे. मुंबई-पुण्यात राज्यातील 72 टक्के रुग्ण आहेत. 

इंद्रायणी घाटावर गुंडांची दहशत; रात्रीच्या काळोखात लुटतायेत नागरिकांना

का वाढला संसर्गाचा दर?
1.    हॉटस्पॉटमधील तपासण्या वाढवल्या
मुंबई-पुणयातील उद्रेक झालेल्या भागातील नागरिकांच्या तपासण्यांवर भर देण्यात आला आहे. या भागात विषाणूंचा फैलाव वेगाने होत असल्याने तेथे कोरोनाबाधीतांचे प्रमाण वाढत असल्याची वस्तूस्थिती आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य खात्यातील अधिकाऱयांनी दिली. पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यात येत आहे. त्यातून राज्यातील संसर्गाचा दर वाढल्याचे चित्र असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

ऐकलतं का? आळंदीत लावले जातेय चोरून लग्न
 

2.  प्रयोगशाळांची संख्या 1 वरून 58 वर
राज्यात पहिला रुग्ण आढळला त्यावेळी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) ही कोरोना निदान करणारी एकमेव प्रयोगशाळा होती. गेल्या 76 दिवसांमध्ये 58 प्रयोगशाळांचे जाळे राज्यभरात निर्माण करण्यात आले. त्यात 35 सरकारी आणि 23 खासगी प्रयोगशाळांचा समावेश आहे. प्रयोगशाळांची संख्या वाढल्याने मोठ्या प्रमाणात रोगनिदानाच्या चाचण्या वाढल्या आहेत.

पुणेकरांनो, मार्केट यार्डातील भुसार बाजाराबाबत महत्त्वाची बातमी; वाचा सविस्तर
 
3.    नमूने तपासणीची वाढलेली संख्या
प्रयोगशाळा वाढल्याने संशयीत रुग्णांचे नमूने घेण्याची संख्या राज्यात गेल्या महिन्याभरात प्रचंड वेगाने वाढली. सोमवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत देशात 30 लाख 33 हजार 591 नमूने तपासण्यात आल्याची माहिती भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) प्रसिद्ध केली. त्यापैकी 12 टक्के (तीन लाख 62 हजार 862) नमूने महाराष्ट्रातील प्रयोगाशाळांनी तपासले आहेत. 

पुणे विद्यापीठ परीक्षा कशी घेणार यावर शिक्कामोर्तब का?

-    संसर्गाचा दर 5 वरून 18 टक्क्यांवर
राज्यातील पहिला रुग्ण 9 मार्चला पुण्यात आढळला. मार्चअखेरपर्यंत राज्यात सहा हजार 331 नमून्यांची तपासणी प्रयोगशाळेत करण्यात आली होती. त्यापैकी 302 जणांना कोरोना झाल्याचे निदान झाले होते. त्यामुळे राज्यातील संसर्गाचा मार्चमध्ये दर पाच टक्के इतका होता. म्हणजे घेतलेल्या नमून्यांपैकी प्रत्येक पाचव्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे प्रयोगशाळेकडून स्पष्ट होत असे. राज्यात 1 ते 24 मे या दरम्यान तपासण्यात आलेल्या दोन लाख 17 हजार 64 नमून्यांपैकी 39 हजार 733 कोरोनाबाधीत आहेत. राज्यात 31 मार्चपर्यंत सुमारे 5 टक्के असलेला संसर्गाचा दर 24 मे या 54 दिवसांमध्ये 18 टक्क्यांपर्यंत वाढला.

विद्यार्थ्यांनो, रोजगार निर्मितीसाठी पुणे विद्यापीठाने घेतला 'हा' निर्णय

“राज्यातील हॉटस्पॉमधून जास्तीत जास्त नमूने संकलित करण्यात आले आहेत. त्यातही पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीचे नमूने घेण्यात येतात. त्यामुळे संसर्गाचा दर वाढल्याचे दिसते. यापूर्वी नमूने वेगवेगळ्या भागातून घेण्यात येत होते. त्यातून पॉझिटीव्ह येण्याचा दर कम होता,”
-    डॉ. प्रदीप आवटे, साथरोग सर्वेक्षण अधिकारी, महाराष्ट्र राज्य


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rate of corona infection in the state in 54 days is quadruple