आता दाढी-कटिंगही महागणार...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

हा निर्णय महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पुणे शहर शाखेतील सर्वसाधारण सभेत घेतला गेला. 1 नोव्हेंबरपासून साधी कटिंग 100 रूपये, तर साधी दाढी करण्यासाठी 50 रूपये आकारले जातील. 

पुणे : महागाई वाढत असतानाचा पुरूषांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असलेल्या दाढी कटिंगचे दरही आता वाढणार आहेत. त्यामुळे पुणेकरांसाठी आता दाढी कटिंगही महागणार आहे. 

हा निर्णय महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पुणे शहर शाखेतील सर्वसाधारण सभेत घेतला गेला. 1 नोव्हेंबरपासून साधी कटिंग 100 रूपये, तर साधी दाढी करण्यासाठी 50 रूपये आकारले जातील. 

यापूर्वी साध्या कटिंगसाठी 80 रूपये आकारले जायचे, तर दाढीसाठी 50 रूपये पण आता हे दर 1 नोव्हेंबरपासून वाढवण्यात येणार आहेत. 

Web Title: rates on shaving and hair cutting rises