स्वस्त धान्य दुकानातून ३५ रुपये किलो तूरडाळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

भवानीनगर - महाराष्ट्रात मागील वर्षी सरकारने बाजार हस्तक्षेप योजनेतून केलेली साडेचार लाख टन तुरीची आता स्वस्त धान्य दुकानातून डाळ उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना ती ३५ रुपये प्रतिकिलो दराने मिळेल, त्यातील ४ रुपये कमिशन स्वस्त धान्य दुकानदारास दिले जाणार आहे.

मागील हंगामात व या वर्षीही सरकारने तूर खरेदी केली. मागील वर्षी साडेचार लाख टन तूर सरकारने खरेदी केली. ती अजूनही तशीच असल्याने तिची विक्री व्हावी, या हेतूने ती तूर स्वस्त धान्य दुकानातून उपलब्ध करून देण्याचा आदेश सरकारने दिला आहे. अन्न नागरी पुरवठा विभागाचे उपसचिव सत्यवान उबाळे यांनी या संदर्भात राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व पुरवठा विभागांना आदेश दिला आहे. 

नव्या आदेशानुसार सरकारने बाजार हस्तक्षेप योजनेत हमीभावाने खरेदी केलेल्या तुरीची भरडई केलेली आहे. ही तूरडाळ स्वस्त धान्य दुकानांना मागणीनुसार व आवश्‍यकतेप्रमाणे देण्याचा आदेश दिला आहे. दुकानदार ही तूरडाळ ३५ रुपये किलोप्रमाणे शिधापत्रिकाधारकास देतील. त्यात ४ रुपये दुकानदाराचे कमिशन असेल. ही तूरडाळ अधिकाधिक विक्री व्हावी, या दृष्टीने प्रयत्न करण्याची सूचना सरकारी पातळीवरून दिल्या आहेत.

Web Title: ration shop turdal