पिंपरी चिंचवडच्या रावण गैंगच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 मार्च 2019

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्याचा मित्र प्रतीक डोके, गणेश पूरी व सोनू शेख असे तिघेजण न्यायालयाच्या गेट क्रमांक 3 जवळील झाडाखाली थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी फिर्यादीच्या दिशेने गोळीबार केला होता. 

पुणे : शिवाजीनगर न्यायालयाजवळ गुरुवारी (ता. 7) झालेल्या गोळीबाराबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पिंपरी चिंचवडच्या रावण गैंगच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

रोहन चंडालिया, अक्षय साबले यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सिद्धेश्वर धर्मदेव शर्मा (वय 21, रा.विकासनगर, देहुरोड) याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्याचा मित्र प्रतीक डोके, गणेश पूरी व सोनू शेख असे तिघेजण न्यायालयाच्या गेट क्रमांक 3 जवळील झाडाखाली थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी फिर्यादीच्या दिशेने गोळीबार केला होता. 

Web Title: Ravana gang In Pimpri Chinchwad gets booked