रवींद्र भट स्मृती पुरस्कार प्रदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

पुणे - जीवनाच्या प्रवासात खडतर वाटचाल सुरू होईल तेव्हा, जिद्द आणि चांगली संगत ठेवल्यास प्रवास सुखकारक होतो. त्यापलीकडे जाऊन तो यशस्वीही होतो, याचा प्रत्यय मला रवींद्र भट यांच्या संगतीतून आला, असे संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांनी सांगितले. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कै. रवींद्र भट स्मृती पुरस्कार डॉ. कामत यांना देण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. गायिका व संगीतकार कुमोद भट, माजी आमदार उल्हास पवार, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, मुख्य कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होत्या. पुरस्काराच्या रकमेतून विद्यार्थ्यांसाठी उपक्रम घेणार असल्याचे कामत यांनी जाहीर केले. 

 पाटील म्हणाले, ‘‘रवींद्रला मी कॉलेजपासून ओळखत होतो. त्याने फार खडतर परिस्थितीतून स्वतःला सावरले आहे. तेव्हा, त्यांच्या पत्नीने खंबीर साथ दिल्याने ते उत्तम काम करू शकले.’’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंडा जोशी यांनी केले. 

Web Title: Ravindra Bhat Memorial Award Dr. Kamat was given the award