
Kasba Bypoll Result : कसब्यात विजयाचा गुलाल उधळलेले धंगेकर 'टू व्हिलरने'च का फिरतात? त्यांनीच सांगितलं सिक्रेट
Kasba Peth Bypoll Election Result 2023 : भाजपचा बालेकिल्ला मानला जाणार कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवरा रवींद्र धंगेकर यांनी सुरूंग लावला. महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११०४० मतांनी पराभव केला.
पोटनिवडणूकीतील विजयानंतर रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या दुचाकीवरून फिरण्याबद्दल देखील खुलासा केला आहे. ते म्हणाले की, पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की हा गड वगैरे काही नाही, हा जनतेचा गड होता. भाजपचा गड नव्हता. सोप्प नव्हतं पण जनतेनं सोप्प केलं.
रविंद्र धंगेकर कधीही चार चाकीमध्ये बसत नाहीत यामागचं रहस्य विचारलं असता ते म्हणाले की फोर व्हिलरमध्ये जायला वेळ लागतो. टू व्हिलरवर लवकर पोहचतो आणि लोकांची काम होतात असे धंगेकर म्हणाले.
मी विजयाने हुरळून जाणारा कार्यकर्ता नाहीये. मी विजय नेहमी बघत आलो आहे. मी रवी धंगेकर होतो तोच आहे अशी प्रतिक्रियी महाविकास आघाडीचे कसबा विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी दिली आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
आज सकाळी देखील धंगेकर हे मतमोजणी केंद्रावर दुचाकीवरून पोहोचले. धंगेकर नेहमी दुचाकीवर प्रास करतात. ते कधीही चारचाकीमध्ये दिसत नाही. या मुद्द्यावर बोलतांना ते म्हणाले होते की, मी दुचाकीवर बसत नाही आणि सिनेमाही बघत नाही. मी आजपर्यंत चित्रपटगृहात गेलेलो नाही. अनेक मित्र सिनेमाची तिकीटं आणून देतात पण मी जात नाही. कारण मला जनतेची सेवा करायची आहे.