कच्ची केळी १० रुपये किलो

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

भवानीनगर - सध्या केळीला १० ते १२ रुपये प्रतिकिलो दर मिळत असला तरी बाजारात मात्र केळी चक्क ३० ते ४० रुपये डझन याच दराने विकली जात आहे. भरमसाट नफेखोरी किरकोळ विक्रेते कमावत आहेत.

भवानीनगर - सध्या केळीला १० ते १२ रुपये प्रतिकिलो दर मिळत असला तरी बाजारात मात्र केळी चक्क ३० ते ४० रुपये डझन याच दराने विकली जात आहे. भरमसाट नफेखोरी किरकोळ विक्रेते कमावत आहेत.

रविवारी (ता. १९) बारामतीत कच्च्या केळीचा दर १० ते १२ रुपये प्रतिकिलोच्या दरम्यान राहिला. त्यातही गबाळ (केळीतील दुय्यम दर्जाची केळी, जी ढीग मांडून विकली जाते) आणखी कमी दराने विकली गेली. मात्र, बाजारातील किरकोळ विक्रीचे केळीचे दर मात्र ३० ते ४० रुपये डझनाच्याच किमतीवर ठाम आहेत. श्रावण महिना सुरू असल्याने हे दर आणखी वाढतील. मात्र, केळी उत्पादकांच्या पदरात मात्र केळीच्या वाढत्या दराचे माप काही पडत नाही, अशी सध्याची स्थिती आहे. 

दरम्यान, केळीचे खरेदीदार कमी झाल्यानेही केळीचे घाऊक बाजारातील दर कमी झाले  असल्याने शेतकऱ्यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांना आमंत्रित केले आहे. युनिफ्रुटी, मदर इंडिया, देसाई  ब्रदर्स या कंपन्यांना बारामती व इंदापुरात पुन्हा केळी खरेदीसाठी उतरविण्याचा केळी उत्पादकांनी प्रयत्न सुरू केला असल्याची माहिती इंदापूर तालुक्‍यातील केळी उत्पादकांनी दिली.

Web Title: Raw banana RS 10 per kg