
येत्या 1 डिसेंबर रोजी या निवडणुका होणार आहेत.
मंचर ता.२८ : “महाविकास आघाडीचे शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर व पदवीधरचे उमेदवार अरुण लाड यांना पाठिंबा देण्याचा निर्णय रयत शिक्षण संस्थेने घेतला आहे.” असे रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागाचे चेअरमन ऍड. राम कांडगे यांनी सांगितले.
हेही वाचा - पुण्यात ऐतिहासिक वारसा असलेले हे सभागृह आजपासून होणार खुले
औंध-पुणे येथे झालेल्या प्रचार सभेत ऍड. कांडगे बोलत होते. आमदार चेतन तुपे, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य बाळासाहेब बेंडे, राजाराम बाणखेले, महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, दिगंबर दुर्गाडे यांच्यासह पदवीधर व शिक्षक मतदार उपस्थित होते.
हेही वाचा - PM मोदींच्या पुणे दौऱ्यात बदल; तब्बल सव्वा चार तास वेळ देणार
“रयत शिक्षण संथेचे अध्यक्ष शरद पवार, चेअरमन डॉ. अनिल पाटील व सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी उमेदवार लाड व प्रा. आसगावकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराची विजयाची वाट सुकर झाली आहे. तरीही गाफील न राहता परिसरातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधून शंभर टक्के मतदान होण्यासाठी प्रयत्न करावेत. पहिल्या पसंतीचे मत द्यावे.” असे आवाहन तुपे यांनी केले.