'देशाच्या स्वातंत्र्यासाठी मुस्लिम समाजाचे योगदान' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

पुणे - या देशातील मुस्लिमांना हिंदुस्थान सोडून जाण्याची भाषा केली जाते. मात्र, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मुस्लिम समाजाचेही मोठे योगदान आहे, हे विसरू नका, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद यांनी केले. हा देश कोणाचीही जहागिरी नाही, असेही त्यांनी नमूद केले. 

कागदीपुरा येथे रझा मुराद यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. कॉंग्रेसचे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे, रोहित टिळक या वेळी उपस्थित होते. 

मुराद म्हणाले, ""या देशाच्या संविधानाने आपल्याला मतदानाचे मोठे हत्यार दिले आहे, त्यामुळे दुसऱ्या हत्याराची आपल्याला गरज नाही. तुमच्या मतांचे विभाजन होऊ देऊ नका. कॉंग्रेस पक्षाने मुस्लिम समाजाला नेहेमी सन्मान दिला आहे.'' 

बागवे म्हणाले, ""केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून या देशातील अल्पसंख्याक, गरीब जनता, झोपडपट्टीवासीय यांना सर्वांत जास्त त्रास झाला आहे. प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर पंधरा लाख जमा होतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली, अशा अनेक घोषणा केल्या; मात्र एकाही घोषणेची पूर्तता अडीच वर्षांत केली नाही. देशाच्या संविधानात सर्व धर्मांच्या लोकांना बोलण्याचा, खाण्याचा अधिकार दिला; परंतु मोदी सरकारने आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली.'' 

Web Title: Raza Murad in pune