
रिझर्व्ह बँकेच्या पातळीवर रुपी बँक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांच्यातील विलिनीकरणाबाबत संयुक्त प्रस्तावाची छाननी प्रक्रिया सुरु आहे. दोन्हीही बँका यासाठी रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा करत आहेत, अशी माहिती रुपी बँकेचे प्रशासक सुधीर पंडित यांनी दिली.
पुणे : रिझर्व्ह बँकेच्या पातळीवर रुपी बँक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांच्यातील विलिनीकरणाबाबत संयुक्त प्रस्तावाची छाननी प्रक्रिया सुरु आहे. दोन्हीही बँका यासाठी रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा करत आहेत, अशी माहिती रुपी बँकेचे प्रशासक सुधीर पंडित यांनी दिली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
रिझर्व्ह बँकेच्या सुचनेनुसार रुपी बँक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांनी परस्पर सहमतीने मान्य केलेला विलिनीकरण प्रस्ताव रिझर्व्ह बँकेला सादर करण्यात आला आहे.
रुपी बँकेच्या ठेवीदांचे नुकसान होणार नाही, त्याचबरोबर राज्य सहकारी बँकेच्या आर्थिक स्थितीवरही अनाठायी बोजा पडणार नाही अशा प्रकारचा हा विलिनीकरणाचा प्रस्ताव आहे. रुपी बँकेचे वैधानिक लेखापरिक्षण लवकरात लवकर पूर्ण करुन घेण्यासाठी बँक प्रयत्नशील आहे, असे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा > नियतीचा क्रूर डाव! वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाचा 'असा' दुर्देवी अंत...कुटुंबियांचा आ
रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधास तीन महिन्यांची मुदतवाढ- रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेवरील रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधाची मुदत 31 मे अखेर होती. त्यास रिझर्व्ह बँकेने आणखी तीन महिन्यांची म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा