esakal | पुरंदरला घरच्या घरी 'वाचन गती वाढ' उपक्रम

बोलून बातमी शोधा

school
पुरंदरला घरच्या घरी 'वाचन गती वाढ' उपक्रम
sakal_logo
By
श्रीकृष्ण नेवसे : सकाळ वृत्तसेवा

सासवड : कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून मार्च 2020 पासून शाळा (school) बंद असून आॅनलाईन मार्गदर्शन सुरु आहे. मात्र प्रत्यक्ष अध्यापन नसल्याने विद्यार्थ्यांची (student) वाचन - लेखन गती मंदावली आहे. त्यातून आॅनलाईन उपक्रम समजावून सांगून वाचन गती वाढविणारा आणि त्यातून एकाग्रता विकसीत करणारा उपक्रम राजेवाडी (ता. पुरंदर) (purandar) बीटमधील 49 शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी राबविला. त्यातून केवळ दोन महिन्यात चांगले यश आले. सव्वापट ते तीनपट अनेक विद्यार्थ्यांची वाचन गती वाढल्याचे दिसून आले. (reading speed ​​increase initiative at purandar.)

राजेवाडी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी पी. एस. मेमाणे हे अगोदरच्या इंग्रजी स्पेलींग पाठांतर, सुंदर हस्ताक्षर, पाढे पाठांतर उपक्रमामुळे अगदी जि.प.अध्यक्ष, सीईअो, शिक्षण आयुक्त, शालेय शिक्षण मंत्र्यांच्या कौतुकास यापूर्वी पात्र ठरले होते. त्यांनीच हा उपक्रम राबविला. त्यासाठी जिल्हा परीषद शाळांच्या या बीटमधील 49 शाळांअतर्गतच्या 47 मुख्याध्यापक, 42 शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, 11 केंद्र प्रमुख व विषयसाधन व्यक्ती, 120 शिक्षकांना व निवडक 61 पालकांना उपक्रम झुम मिटींगद्वारे समजून सांगितला. त्यातून इयत्ता तिसरी ते सातवीचे 1,358 विद्यार्थी नित्यदिनी सहभागी झाले. प्रारंभीच्या वाचनाची नोंद घेऊन शिक्षकांनी सांगितलेल्या पद्धतीने पालकांनी स्वतःसमोर गतीने विद्यार्थ्यास वाचन करावयास लावायचे. सुरवातीला काही शब्द चुकतात. पण घड्याळ लावून सरावाने व एकाग्रता वाढली की, एक मिनीटाची ही वाचन गती वाढते. पुढे मग दूरचित्रवाणीवरील बातमीतील खाली सरकणारी पट्टी दहा मिनीटे वाचण्याची सवय लावली की, त्यातून तर अधिक गती येते. शिवाय सामान्यज्ञानात भर पडते. एप्रिलअखेर वाचन गती वाढीचे अहवाल संकलीत केले., त्यात वाचन गती सव्वापट ते तीनपट वाढल्याचे दिसून येत आहे. एखतपूर, सोनोरी, बोरमाळ, बोरावकेमळा, चौंडकरवस्ती, वाडेकरवस्ती, गायरानवस्ती आदी शाळांची तर मोठी आघाडी आहे. त्यातून गटविकास अधिकारी अमर माने, गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे वाचनाबरोबरच लेखन गती वाढविण्याचा उपक्रम हाती घेण्याचा प्रयत्न आहे., असे मेमाणे `सकाळ`शी बोलताना म्हणाले.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये संसर्ग वाढला; मृत्यूदर घटला

उपक्रमाचे फायदे - थोड्या मार्गदर्शनात घरच्या घरी वाचन गती उपक्रम * सरावाने गती व एकाग्रता वाढते * कमी वेळात अधिक अभ्यास होतो * फायदा दिसल्याने विद्यार्थी - पालकांत समाधान * चुकीचे उच्चार दुरुस्त होतात * मिनीट ते दहा मिनीटे टप्पे असल्याने उपक्रमाने कंटाळा नाही * पुस्तकाशिवाय वाचनाने नवे शब्द व माहिती मिळते * अवधान केंद्रीकरणास उपयुक्त उपक्रम

काही विद्यार्थी नावे, गाव, आधीचे एक मिनीटातील वाचन शब्द, उपक्रमाच्या प्रगतीनंतर शब्दसंख्या ः

* श्वेता जरांडे, सोनोरी - 202 - 269, सायली काळे, सोनोरी - 317 - 381, तेजश्री झुरंगे, एखतपूर - 210 - 368, सेजल झुरंगे, एखतपूर - 189 - 365, राजगौरी टिळेकर, एखतपूर - 110 - 368, आदित्य खेसे, चौंडकरवस्ती - 80 - 230, दर्शन जगताप, राजेवाडी - 180 - 236, हर्षद खेसे, राजेवाडी - 230 - 285.

हेही वाचा: पुणे मार्केटयार्डातील फळविभागामधील बारा बेशिस्त अडत्यांवर दंडात्मक कारवाई

*वाचन गतीवाढ उपक्रमाने एकाग्रतेमुळे व सरावाने जवळपास 90 टक्के विद्यार्थ्यांचे वाचन सुधरुन गतीही वाढली.-बाळासाहेब जगताप (शिक्षक, राजेवाडी).

* काही मिनीटांचा उपक्रम असल्याने मुले - मुली कंटाळा करीत नाहीत. वाचनाची सवय वाढतेय. गतीशिल वाचनाचे मुल्यमापन सहजसोपे होते, फक्त पालकांनी सातत्य ठेवले पाहिजे.-मनिषा सुरवसे, मुख्याध्यापक (सोनोरी) रोहीणी कामथे (एखतपूर).

*अगदी काही मिनीटांच्या वाचन उपक्रमाने अभ्यासक्रमातील पुस्तकांव्यतिरिक्तही माहिती मिळते. यश पाहून पालकांनी नातेवाईक, मित्र परीवार यांच्या इतर गावच्या मुलांनाही उपक्रम समजून सांगून सहभागी होण्यास सांगावे.-सतिश हागवणे (अध्यक्ष, शाळा व्य.समिती, हगवणेवस्ती-वनपुरी).