तयार कपड्यांसाठी बाजारपेठ उभारावी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

पुणे - तयार कपड्यांच्या क्षेत्रातील मुंबईनंतरची दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ पुण्यात असल्याने सरकारने शहरात या क्षेत्रासाठी मध्यवर्ती बाजारपेठ उभारावी, तसेच कायमस्वरूपी प्रदर्शनासाठीही जागा द्यावी, अशी मागणी पुणे जिल्हा होजिअरी रेडिमेड अँड होलसेल असोसिएशनने केली आहे.

‘सकाळ’ने या क्षेत्रातील व्यापाऱ्यांची बैठक नुकतीच बोलावली होती. या वेळी या संघटनेचे अध्यक्ष मनोज सारडा, सचिव कल्पेश पोरवाल, खजिनदार धनेश मुथियान, बी टू बी गारमेन्ट फेयर कमिटीचे अध्यक्ष रितेश कटारिया, वादनिवाडा समिताचे वैभव लोढा, पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महेंद्र पितळिया उपस्थित होते. 

इचलकरंजी, सोलापूर, अमरावती आदी शहरांत सरकारने कापड उद्योगासाठी जागा दिली आहे. त्यातून तेथील उद्योगवाढीला चालना मिळून नवीन रोजगार उपलब्ध झाले आहेत. पुण्यातील व्यापारही आणखी वाढावा, यासाठी सरकारने मदत करण्याची गरज आहे, असे मत संघटनेतर्फे व्यक्त करण्यात आले.

असोसिएशनची सुरवात १९९२ मध्ये झाली. त्या वेळी आमच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी आम्ही एकत्र आलो. सध्याची व्यापाऱ्यांची गरज कापड केंद्र ही असून, महापौर, मंत्र्यांना हा प्रश्‍न सांगितला तरी ते सोडवत नाही, अशी खंतही या व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

शहरात जवळपास सहा हजार किरकोळ विक्रेते असून, सुमारे सहाशे घाऊक विक्रेते आहेत. संघटनेच्या कार्यकारिणीत अकरा सदस्य असून सदस्यांची संख्या एकशेपंचवीस आहे.

Web Title: readymade cloth market