वाल्हेत पुनर्रचित अभ्यासक्रम कार्यशाळा संपन्न

walhe
walhe

वाल्हे : वेगाने बदलणाऱ्या शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समाजिक, भावनिक गरजा लक्षात घेऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांत स्वसंकल्पना व आत्मविश्वास निर्माण करावा. या कार्यशाळेमधून विद्यार्थी विकासासाठी शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञान, जीवनमुल्ये, परंपरा संस्कृती व लोकशाही मूल्यांची रूजवणुक करावी. बदलत्या काळामध्ये आधुनिक तंत्राद्वारे रयत मधील मुले कशी पुढे जातील यासाठी सर्वांनी सकारात्मक काम करा, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी एस.टी.पवार यांनी केले.

वाल्हे (ता.पुरंदर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षि वाल्मिकी विद्यालयामध्ये आज इयत्ता नववी दहावीच्या गणित व विज्ञान 'पुनर्रचित अभ्यासक्रम बदलती आव्हाने' या विषयी शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.याचे उदघाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी एस. ए. शिंगाणा, आर.बी.महाडीक, एस.एस.शेटे, ए.डी.भागवत, डी.एस.घार्गे, एन.व्हि.लोहार, एस.बी.गुरव, एस.बी.मिंड, पी.सी.राऊत, पी.एम. आडमुठे, जी.ई.साळुंखे आदि उपस्थित होते.

या कार्यशाळेमध्ये आलेल्या शिक्षकांनी हे प्रशिक्षण गांभीर्याने घेऊन आपापल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नवउपक्रम व परिपुर्ण नियोजन करणे महत्वाचे आहे. शिक्षण घेताना कोणताही विद्यार्थी अप्रगत राहणार नाही, हा ध्यास प्रत्येक शिक्षकांचा असावा, असे मतही सहाय्यक विभागीय अधिकारी एस.टी.पवार यांनी व्यक्त केले.

दरम्यान या कार्यशाळेसाठी ३६ शाखांमधुन गणित व विज्ञान विषयाचे जवळपास 75 शिक्षक सहभागी झाले होते. येथील राजेंद्र डोंगरे, एस.एम.भामे, ए.ए.गडवे, एस.पी.खताळ, ए.बी.दरेकर, आर.व्हि सोनवणे, डी.एस.मंडलिक आदिंनी सहकार्य केले.

विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत जाधव यांनी प्रास्ताविक केले.पी.बी.जगताप यांनी सुत्रसंचालन तर पर्यवेक्षक बी.ए.कुंभार यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com