दापोडीत रंग नसलेले गतिरोधक ठरताहेत अपघाताचे कारण

रमेश मोरे
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

जुनी सांगवी - दापोडी-सांगवी प्रमुख रस्ता व दापोडीतील अंतर्गत रस्त्यावर गतिरोधकांना पांढरे पट्टे नसल्याने असे गतिरोधक अपघाताचे कारण ठरत आहेत. दापोडी सांगवी रस्त्यावर एस.टी.कार्यशाळा वळणावर सांगवी व दापोडी दोन्ही बाजुने उतार रस्ता आहे. उतार रस्ता असल्यामुळे या वळणावर गतिरोधक करण्यात आलेला आहे. मात्र गतिरोधकाला पांढरे पट्टे नसल्याने वाहनचालकांच्या हा गतिरोधक नजरेस येत नाही. परिणामी वेगात असणारी वहाने आदळुन गतिरोधक अपघाताचे कारण ठरत आहे. 

येथील स्वामी विवेकानंद शाळा, वरची आळी, टण्णु भगतसिंह शाळा, बुद्धविहार येथील गतिरोधकांच्या पांढ-या पट्टयांचा रंग उडालेला आहे. वाहन चालक नागरीकांच्या गतिरोधक सहज लक्षात येत नाही. परिणामी वाहनचालकांकडुन वेगात वाहने दामटली जातात. या रस्त्यावर नियमित मोठी गर्दी असते. यातच शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेत विद्यार्थ्यांना वहातुककोंडीचा सामना करावा लागतो. तर रात्री रंग नसलेले गतिरोधक वाहनचालकांच्या नजरेस येत नाहित.यातच पावसाचे दिवस असल्याने ओल्या रस्त्यावर दुचाकी घसरून पडल्याच्या घटनाही या परिसरात यापुर्वी घडल्या आहेत. या सर्व ठिकाणच्या गतिरोधकांना पांढरा रंग देण्यात यावा अशी मागणी नागरीकांमधुन होत आहे. 

येथील ब-याच ठिकाणच्या गतिरोधकांना पांढरे पट्टे नाहीत.तर अनेक ठिकाणचे पांढरेपट्टे पुसट झालेले आहेत. रात्री लक्षात येत नाहीत.
- रविंद्र बाईत- नागरीक

येथील रंग नसलेल्या गतिरोधकांना रंग लावण्याबाबत स्थापत्य विभागाला  कळविले आहे.
- माई काटे नगरसेविका

सांगवी दापोडी पुल रस्ता व पदपथाचे काम नुकतेच करण्यात आलेले आहे.येथील रंग नसलेल्या गतिरोधकांना रंग लावण्यात येईल.
-शिरिष पोरेड्डी- प्रवक्ते स्थापत्य "ह" क्षेत्रीय विभाग

Web Title: The reason for the accident is colorless speed breaker in dapodi