उजनी धरणाच्या पाण्यासाठ्यात वाढ; शेतकऱ्यांना दिलासा

ujani-dam.jpg
ujani-dam.jpg

भिगवण : पावसाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही इंदापुर तालुक्यामध्ये केवळ ९० से.मी. पाऊस झाला आहे तर धरणातही समाधानकारक पाणी साठा नसल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता. मागील दोन दिवसांपासुन धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या जोरदार पावसामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

शनिवारी(ता.२७) दुपारी अचानक भिमातील पाणी वाढु लागल्यामुळे नदीकाठी असलेले विदयुत पंप काढण्यासाठी शेककऱ्यांची एकच धांदल उडाली. रविवारी(ता.२८) दुपारपर्यंत धरणांमध्ये पाच टी.एम.सी पाण्याची भर पडत पाणीसाठा वजा २१ टक्के इतका झाला होता.

इंदापुर तालुक्यासह दौंडच्या पुर्व भागामध्येही पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा हवादिल झाला होता. त्यातच पावसाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही धरण मायनसमध्ये राहिल्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचीही चिंता वाढली होती. त्यामुळे शेतकरी या भागामध्ये तसेच धऱण क्षेत्रांमध्ये दमदार पावसाची अपेक्षा करीत होती.

शनिवारी(ता.२७) उजनी धरण क्षेत्रामध्ये दमदार पावसास सुरुवात झाली व भिमेच्या उपनदयांमध्ये पुरसदृश स्थिती निर्माण झाली होती. शनिवारी दुपारनंतर बंडगार्डन येथील ३० हजार ९४२ क्युसेक्स तर दौंड येथून ८७ हजार५४८ क्वुसेकने भिमा नदीमध्ये विसर्ग सुरु होता. यामुळे धरणातील पाणी साठ्यामध्ये वाढ होऊन पाणी पातळी ४८९.२२० मीटर पोहोचली होती. रविवारी(ता.२८) दुपारी बारा वाजेपर्यंत पाणीसाठ्यामध्ये वाढ होऊन वजा २१ टक्के इतका पाणीसाठा उजनी धरणामध्ये झाला होता. शनिवारी दुपारपासुन ते रविवारी दुपारपर्यंत पाणी साठ्यांमध्ये सुमारे पाच टी.एम.सी. वाढ झाली आहे. धरणशक्षेत्रामध्ये आणखी दोन दिवस पाऊस राहल्यास जूलैअखेर उजनी प्लसमध्ये येण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 

शनिवारी(ता.२७) दुपारनंतर भिमा नदीमध्ये अचानक पाणी आल्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांची धांदल उडाली. नदीमध्ये पाणी वाढत असल्याची बातमी शेतकऱ्यांना कळताच शेतकऱ्यांनी भिमा नदी पात्राकडे धाव घेतली. राजेगांव, खानोटा(ता.दौंड) डिकसळ, भिगवण, तक्रारवाडी(ता.इंदापुर) आदी ठिकाणचे विदयुत पंप पाण्याखाली जावुन काही प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसानही झाले. पाणीसाठा वाढत असल्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com