Vidhan Sabha 2019 : बापटांच्या मध्यस्थीने मोकाटेंचे बंड थंड

विनायक बेदरकर
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

Vidhan Sabha 2019 : कोथरुड : कोथरुड मतदार संघात भाजपकडून चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी बंडाचे निशाण फडकले होते. पण आज चंद्रकांत पाटील यांनी खासदार गिरीश बापट यांच्या मध्यस्थीने मोकाटे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन बंड थोपवले.

Vidhan Sabha 2019 : कोथरुड : कोथरुड मतदार संघात भाजपकडून चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी बंडाचे निशाण फडकले होते. पण आज चंद्रकांत पाटील यांनी खासदार गिरीश बापट यांच्या मध्यस्थीने मोकाटे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन बंड थोपवले. चंद्रकांत पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीतील रथामध्ये पाटील यांच्या समवेत मोकाटे दिसल्याने सर्वांचं आश्चर्याचा धक्का बसला.Image may contain: 7 people, people standing

आज कोथरूडमधून शिवाजी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पाटील यांची अर्ज भरण्याचे रॅली निघणार होती तत्पूर्वी त्याअगोदर पाटील यांनी मोकाटे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर मोकाटे हे पाटील यांच्या रॅलीमध्ये सहभागी झाले. या चर्चेवेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची मध्यस्थी कामी आल्याचे बोलले जात आहे.

गेल्या दोन दिवसांपासून बंडखोरीच्या तयारीत असलेल्या मोकाटे यांचे बंड थोपवण्यात पाटलांना यश आले. यावेळी बोलताना माजी आमदार मोकाटे म्हणाले, ''सकाळी चंद्रकांत दादा माझ्या घरी चहापानासाठी आले होते. यावेळी मी मतदारसंघातील प्रश्न सोडविण्याची त्यांना विनंती केली. कोथरूडमधील मतदार आणि विरोधी पक्षांचा मला निवडणूक लढविण्यासाठी आग्रह होता. त्यांचे मी आभार मानतो. मी शिवसेनेच्या विचारा विरोधात जाऊ शकत नाही. त्यामुळे मी मनापासून महायुतीचे काम करणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The rebellion of Mokate in Vidhan Sabha 2019 cools down with the mediation of the Girish Bapat