‘रेसिपी शो स्पर्धे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

‘मधुरांगण’चे सभासद व्हा आणि मिळवा अवधूत गुप्ते लाइव्ह कॉन्सर्टची प्रवेशिका भेट

पुणे - पाककलातज्ज्ञ संगीता शहा, प्रसिद्ध शेफ प्रसाद कुलकर्णी, शेफ पिनाक लोंबर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘सकाळ मधुरांगण’ने नुकत्याच आयोजित केलेल्या ‘समर कूल रेसिपी शो’मध्ये वैविध्यपूर्ण पदार्थांच्या रेसिपी सादर केल्या. शेफ प्रसाद व त्यांच्या सहकाऱ्यांनी सॅलड व स्मुदीविषयक अनेक प्रश्‍नांची उत्तरे दिली, तर ‘समर कूल रेसिपी शो’नंतर न्युट्रिशियन अमृता कुलकर्णी यांनी विशेषतः उन्हाळ्यात सॅलड खाण्यामुळे होणाऱ्या फायद्यांची माहिती दिली. 

याप्रसंगी पाककृती स्पर्धाही घेण्यात आली. यात मधुरांगण सभासद व ‘सकाळ’च्या वाचकांनी सहभाग घेतला. काही नावीन्यपूर्ण पाककृतींना परीक्षक तसेच स्पर्धकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पाककृती स्पर्धेत अनुपमा मराठे, स्वाती जोशी, शीतल गवस यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. ‘फ्लेवर्स ऑफ सिटी’ स्पर्धेचे बक्षीस प्रायोजक होते.

गुप्ते लाइव्ह कॉन्सर्ट
त्वरित मधुरांगणचे सभासद व्हा आणि मिळवा ‘अवधूत गुप्ते लाइव्ह कॉन्सर्ट’ची (रु. ५००) प्रवेशिका. प्रवेशिका बुधवारपासून (ता. १०) उपलब्ध. कार्यक्रम २० मे रोजी (शनिवार) सायंकाळी ६.३० वाजता आयएलएस लॉ कॉलेजच्या ग्राउंडवर.

अधिक माहितीसाठी 
संपर्क : ८३७८९९४०७६ 
किंवा ९०७५०१११४२

येथे करा नोंदणी...
सकाळ मुख्य कार्यालय, ५९५, बुधवार पेठ आणि सकाळ पिंपरी कार्यालय (सकाळी ११ ते सायंकाळी ६)  
गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ‘मधुरांगण’ ॲप इन्स्टॉल करून नोंदणी करा. 
गिफ्ट व इतर सर्व साहित्य घरपोच हवे असेल, तर कुरिअरचा ऑप्शन निवडून सभासदत्व व कुरियर शुल्क ऑनलाइन भरावे
नोंदणी शुल्क रु. ९९९

.. अन्‌ याचा लाभ घ्या
 १ हजार ४९९ रुपये किमतीच्या भेटवस्तू
 रु. ७००० पेक्षा अधिक रकमेची सवलत कुपन
 १२ तनिष्का मासिकांसाठी कुपन संच
 मधुरांगण ओळखपत्र 
 सभासद नोंदणी करताना भेटवस्तू घेऊन जाण्यासाठी मोठी कॅरीबॅग आणणे आवश्‍यक आहे.

Web Title: recipe show competition by madhurangan