बांधकाम क्षेत्राला पुन्हा उभारी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

construction

बांधकाम क्षेत्राला पुन्हा उभारी!

पुणे : कोरोनामुळे मंदावलेली बांधकामे आता पुन्हा जोमात सुरू झाल्याने पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रात सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत पुण्यात बांधकाम सुरू असलेल्या सदनिकांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत २६.३ टक्क्यांनी वाढली आहे.

हेही वाचा: अखेर ; पिंपळ्यातील अतिक्रमण जिल्हाधिकाऱयांनी हटविले

जानेवारी ते जून २०२१ दरम्यान शहरात एकूण १२ हजार ५५८ सदनिका असलेले गृहप्रकल्प सुरू झाले आहेत. गेल्या वर्षी याच काळात हा आकडा नऊ हजार ९४४ होता. दोन्ही वर्षांची तुलना केली असता ही टक्केवारी २६.३ ने वाढली आहे, तर जानेवारी ते जून २०२० दरम्यान पुण्यात २० हजार ४३१ सदनिकांची विक्री झाली होती. मात्र, यंदा त्यात घट होत तो आकडा १६ हजार २२० पर्यंत घट झाली आहे. विक्री कमी झाली असली तरी नवीन प्रकल्प सुरू होत असल्याचे ऑनलाइन रिअल इस्टेट ब्रोकरेज फर्म ‘प्रॉप टायगर’ने (PropTiger.com) केलेल्या अहवालात नमूद केले आहे. दुसऱ्या तिमाहीत (एप्रिल-जून) गेल्या वर्षी एक हजार २५१ सदनिकाअसलेले प्रकल्प सुरू झाले होते. त्यात या वर्षी १२५ टक्क्यांनी वाढ होत ही संख्या दोन हजार ८१० युनिट्सवर पोचली आहे.

हेही वाचा: कात्रज चौक ते दत्तनगर चौक रस्त्यावर वाहतूककोंडी

मागणी व पुरवठा

नव्याने सुरू झालेल्या प्रकल्पांमध्ये दोन बीएचके असलेल्या घरांचे प्रमाण हे ७२ टक्के आहे. त्यानंतर तीन बीएचके असलेल्या घरांचा वाटा जवळजवळ १९ टक्के आहे. वर्क फार्म होममुळे मोठ घर घेण्याला पसंती वाढली आहे. ग्राहकांची हीच मागणी विचारात घेऊन विकसकांनी देखील मोठी घरे बांधण्याला पसंतीला दिल्याचे या अहवालातून स्पष्ट होते. शहरातील एकूण पुरवठ्यापैकी नवीन सुरू झालेल्या प्रकल्पांमधील सदनिकांची किंमत ४५ ते ७५ लाख रुपयांच्या दरम्यान आहे. जी एकूण पुरवठ्याच्या जवळजवळ ६२ टक्के आहे. त्यानंतर २५ टक्के हिस्सा हा ४५ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांचा आहे.

हेही वाचा: पुणे : पोलिस आयुक्तालयात आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या सुरेश पिंगळेंचा मृत्यू

परवडणाऱ्या घरांचा मुद्दा बाजूला ठेवला तरी संभाव्य घर खरेदीदारांमध्ये स्वतःचे घर घेण्याची जिज्ञासा वाढलेली आहे. कारण कोविड काळात मालकीच्या घराचे महत्त्व वाढले आहे. कोरोनाची दुसरी लाट कमी होत असल्यामुळे घरांच्या मागणीत वाढ झाली आहे. बाजार अहवाल आणि विश्लेषण सूचित करतात की, येणारे महिने बांधकाम क्षेत्रासाठी चांगले ठरतील. - मणी रंगराजन, कार्यकारी अधिकारी, प्रॉप्टिगर डॉट कॉम, हाउसिंग डॉट कॉम आणि मकान डॉट कॉम ग्रुप

अहवालातील महत्त्वाचे मुद्दे...

  • मुंबई व दिल्लीनंतर पुण्यात घरांची सर्वाधिक विक्री

  • आयटी हबमध्ये एप्रिल ते जून दरम्यान घरांची सर्वाधिक मागणी

  • दुसऱ्या तिमाहीत देशातील प्रमुख आठ शहरांमध्ये १५,९६८ सदनिका विकल्या गेल्या. दुसऱ्या सहामाहीत पुण्यातील बांधकाम क्षेत्र पुन्हा उसळी घेण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Reconstruction Of The Construction Sector

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..