रुग्णांच्या ‘मेडिकल हिस्ट्री’ची नोंद ठेवणार

रुग्णांच्या ‘मेडिकल हिस्ट्री’ची नोंद ठेवणार

पुणे - कोरोनाच्या साथीचा धडा घेऊन महापालिकेच्या आरोग्य खात्याने आता उपचार व्यवस्थेतील बदलांना सुरुवात केली आहे. त्यानुसार खासगी रुग्णालयांच्या धर्तीवर पालिकेच्या रुग्णालयांत येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची ‘मेडिकल हिस्ट्री’ची नोंद ठेवली जाणार आहे.   

या व्यवस्थेमुळे साथीच्या आजारांत संबंधित रुग्णांवर नेमके उपचार करणे सोपे होणार आहे. त्यासाठी रुग्णांचे वय, आजार, त्यातील गुंतागुंत, त्यावरील निदान आणि उपचार प्रक्रिया यांची माहिती संकलित केली जाणार आहे. नव्या उपचार व्यवस्थेत महापालिकेची रुग्णालये, दवाखान्यांतील उपचारांना खासगी हॉस्पिटलमधील यंत्रणा जोडली जाणार असून, त्यामुळे रुग्णांना वेळेत आणि योग्य उपचार देण्याचा प्रयत्न आहे, असे महापालिकेच्या आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे. 

पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्रावर 'राडा'; दोन्ही गटातील कार्यकर्ते भिडले​

शहरातील नागरिकांना अल्पदरात उपचार पुरविण्यासाठी महापालिकेची ७२ रुग्णालये, दवाखाने आहेत. मात्र, सध्या रुग्णांच्या आजारांबाबतची कोणतीच माहिती आरोग्य खात्याकडे नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी रुग्णांच्या तपासण्या करण्याची प्रक्रिया करावी लागते. रुग्णांची ‘मेडिकल हिस्ट्री’ नसल्याने कोरोनाच्या साथीत रुग्णांवरील उपचारांत विलंब झाल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. कोरोनासोबतचे अन्य आजार जाणून घेण्यात वेळ गेल्याने काही रुग्णांवर नेमके उपचार  झाले तरी त्यामुळे काही जणांना जीव गमवावा लागल्याचे पुढे आले आहे. या बाबींवर गांभीर्याने विचार करीत कोरोना रुग्णांची ‘मेडिकल हिस्ट्री’ गोळा करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली होती. त्याच  धर्तीवर आता महापालिकेची रुग्णालये, दवाखान्यांतही ती सोय  उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी आता आरोग्य खात्याने स्वतंत्र माहिती-तंत्रज्ञान  विभाग (आयटी) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक रुग्णालयात नवी संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे रुग्णांची माहिती संकलित करणे सोयीचे होईल, असे महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी स्पष्ट केले. 

धनंजय मुंडे Genuine माणूस, पक्ष योग्य निर्णय घेईल : रोहित पवार

डॉ. वावरे म्हणाले, ‘‘रुग्णांच्या सोयीसाठी रुग्णालयांत कामाची व्याप्ती वाढविण्यात येणार असून, त्यातून रुग्णांच्या आजाराची माहिती उपलब्ध करून त्यातून उपचारांना वेग देता येणार आहे. अत्यावश्‍यक उपचारांत अन्य तपासण्यांमध्ये वेळ जाणार नाही. त्यासाठी रुग्णकेंद्रीत व्यवस्था उभारली जाईल.’’

प्रत्येक रुग्णालयात ‘आयटी सेल’
महापालिकेच्या रुग्णालयांतील रुग्णांचे प्रमाण, त्यांच्या आजारांचे स्वरूप आणि उपलब्ध यंत्रणा, याचा आढावा घेऊन नव्याने संगणक प्रणाली वापरात आणण्यासाठी आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक झाली. तीत बाह्यरुग्ण कक्ष (ओपीडी), प्रसूतिगृहांपासून सर्व रुग्णालयांत ‘आयटी सेल’ तयार करण्याची प्राथमिक योजना मांडण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com