वेगवेगळ्या शहरांतून चार लाखांची वसुली 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

पुणे - कॉसमॉस बॅंकेच्या एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅकिंगवेळी काही ग्राहकांच्या खात्यामध्ये जमा झालेले व ग्राहकांनी तत्काळ काढलेले पैसे वसूल करण्यावर पोलिसांच्या विशेष पथकाने (एसआयटी) लक्ष केंद्रित केले आहे. आत्तापर्यंत वेगवेगळ्या शहरांमधून चार लाखांहून अधिक रक्कम पथकाने वसूल केली आहे. 

कॉसमॉस बॅंकेचे सर्व्हर हॅक करून हॅकर्सनी 94 कोटी 42 लाख रुपये पळविले होते. या सायबर हल्लेखोरांपर्यंत पोचण्याबरोबरच गेलेले पैसे परत मिळविण्यासाठी एसआयटीचे प्रयत्न सुरू आहेत. हॅकर्सकडून हॅकिंग करतानाच्या कालावधीत बॅंकेच्या काही एटीएम कार्डधारकांच्या खात्यामध्ये काही रक्कम जमा झाली होती. पैशांच्या हव्यासापोटी काही कार्डधारकांनी ही रक्कम तत्काळ काढली होती. 

याप्रकरणी एसआयटीच्या प्रमुख व आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त ज्योती प्रिया सिंह म्हणाल्या, ""हॅकिंग दरम्यान पुणे, मुंबई व इंदूर या ठिकाणच्या बॅंकेच्या काही ग्राहकांच्या खात्यात जादा रक्कम जमा झाली होती. काही ग्राहकांनी ती काढली होती, तपासणी करताना ही बाब समोर आली. विविध ठिकाणांहून आत्तापर्यंत सहा जणांकडून चार लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे. या रकमेमध्ये आणखी वाढ होईल.'' 

टॉप टेन देशांची निवड 
सायबर हल्ला सुरू असताना ज्या देशांमधून सर्वाधिक पैसे काढण्यात आले आहेत, अशा "टॉप टेन' देशांची निवड करण्यात आली आहे. अन्य देशांच्या तुलनेत त्या दहा देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे काढले गेले, त्यांच्याशीही पुणे पोलिसांसह केंद्रीय पातळीवरून पत्रव्यवहार करण्यात आला आहे. 

Web Title: Recovery of four lakhs in different cities