पुणे : पीएमपीत २५० कंडक्‍टरची भरती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या नव्या ई-बसला विविध ठिकाणी चार्जिंगची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी पीएमपीने पाच आगार निश्‍चित केले आहेत. त्याला महावितरणनेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तर सुमारे २५० कंडक्‍टरची भरती प्रक्रियाही आठ दिवसांत पूर्ण होणार आहे.

पुणे - पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या नव्या ई-बसला विविध ठिकाणी चार्जिंगची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी पीएमपीने पाच आगार निश्‍चित केले आहेत. त्याला महावितरणनेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तर सुमारे २५० कंडक्‍टरची भरती प्रक्रियाही आठ दिवसांत पूर्ण होणार आहे. नव्या बसचा बूस्टर मिळाल्यामुळे पीएमपी प्रशासन जोमात कामाला लागले आहे. 

पीएमपीच्या ताफ्यात १०० ई-बस येत्या आठ दिवसांत दाखल होणार आहेत. तसेच केंद्र सरकारनेही १५० ई-बस नुकत्याच मंजूर केल्या आहेत. नव्या बस आणि त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे, अशी माहिती सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांनी दिली. बाणेर, रावेत, मोशी, कात्रज आदी चार ठिकाणी पाच चार्जिंग स्टेशनची परवानगी महावितरणकडे मागितली आहे. बसची देखभाल संबंधित कंपनी करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

नॅशनल इलेक्‍ट्रिक अर्बन मोबिलिटी मिशनमध्ये केंद्र सरकारने पीएमपीसाठी १५० बस दिल्याबद्दल अभिमान वाटत आहे. नव्या बससाठी प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करून लवकरच त्या प्रवाशांच्या सेवेत आणण्याचे पीएमपीचे उद्दिष्ट आहे.
- नयना गुंडे,  अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recruitment of 250 conductors in PMP