esakal | मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरच्या क्रीडा विभागात भरती
sakal

बोलून बातमी शोधा

sports

मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरच्या क्रीडा विभागात भरती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरच्या (कर्नाटक) बॉईज स्पोर्ट्स कंपनीतर्फे (बीएससी) कुस्ती क्रीडा विभागात मुलांसाठी भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. ही प्रक्रिया २७ ते ३० सप्टेंबर या कालावधित सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव (कर्नाटक) येथे होणार आहे.  

ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, म्हैसूर, गुजरात, आंध्र प्रदेश आणि मध्यप्रदेश येथील उमेदवारांसाठी होणार आहे. यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता चौथी पास आणि वयोमर्यादा ही ८ ते १४ वर्षे ठेवण्यात आली आहे. मात्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचे प्रमाणपत्र किंवा पदक असलेल्या अत्यंत प्रवीण उमेदवारांसाठी वयाचे निकष शिथिल केला जाऊ शकते. भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी आपले आधीचे पदक आणि कुस्ती स्पर्धेत मिळवलेल्या यशाचे प्रमाणपत्र जिल्हास्तरावर तसेच बीएससीच्या कार्यालयात महत्त्वाची कागदपत्रे सादर करावे लागणार आहेत.

हेही वाचा: गौताळा घाटात नागद-कन्नड मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

भारतीय क्रीडा प्राधिकरण (एसएआय), क्रीडा वैद्यकीय केंद्र (एसएमसी) आणि बॉइज कंपनी ही निवडप्रक्रिया पूर्ण करणार आहेत. या प्रक्रियेत जिल्हा, राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत विजयी झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवारांनी बीएससीच्या कार्यालयात खालील महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी. निवडलेल्या उमेदवारांना इंग्रजी किंवा हिंदी माध्यमातून मोफत प्रशिक्षण दिले जाईल. त्याशिवाय, एससएआयमार्फत त्यांना कुस्तीचे प्रशिक्षण दिले जाईल.

निवड प्रक्रियेसाठी ही कागदपत्रे असणे आवश्‍यक

- जन्म दाखल्याची मूळ प्रत

- जात प्रमाणपत्राची मूळ प्रत

- शिक्षण दाखला, गुणपत्रिका

- सरपंच किंवा शाळेकडून मिळालेला चारित्र्याचा दाखला

- तहसीलदार/जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडून जारी केलेली निवासी पत्त्याचे प्रमाणपत्र

- दहा रंगीत छायाचित्रे

- जिल्हा, राज्य किंवा राष्ट्र पातळीवर क्रीडा स्पर्धेतील सहभागाची प्रमाणपत्रे

- आधार कार्ड

loading image
go to top