रेडिओ सागरमित्र 90.4 एफएम

Redio
Redio

पिंपरी - राज्य सरकारच्या निर्णयामुळे सध्या प्लॅस्टिकबंदीचा विषय सर्वत्र चर्चेत असला, तरी शहरातील अनेक शाळांमधील विद्यार्थी प्लॅस्टिक जमा करून ते पुनर्वापरासाठी सागरमित्र अभियानाकडे देत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे अव्याहतपणे सुरू आहे. हे काम करत असताना मुलांना आलेले अनुभव आता तुम्हाला ‘रेडिओ सागरमित्र ९०.४ एफएम’ या माध्यमातून ऐकता येणार आहेत. येत्या जूनपासून या अनोख्या उपक्रमाला सुरवात होणार असल्याचे सागरमित्र अभियानाचे समन्वयक विनोद बोधनकर यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

कचरा व्यवस्थापनाचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असल्याने प्लॅस्टिक कचऱ्यावर मार्ग काढण्यासाठी सागरमित्र अभियानाने विद्यार्थ्यांद्वारे प्लॅस्टिक कचरा गोळा करून त्याचा पुनर्वापर करायचा, हा उपक्रम सुरू करण्यात आला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील १४६ शाळांमधील एक लाख ३४ हजार मुलांच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येत आहे. आता ‘रेडिओ सागरमित्र’ या अनोख्या उपक्रमात शाळांमधील ही मुले सहभागी होऊन, त्यांना हे काम करीत असताना आलेले अनुभव श्रोत्यांशी शेअर करणार आहेत. मुलांबरोबरच शाळेचे मुख्याध्यापक, पालकही यामध्ये सहभागी होणार आहेत. दर शनिवारी दिवसभरातील एक तास यासाठी ठेवण्यात आला आहे. रेडिओवर मुले बोलत असताना त्याचा व्हिडिओ आणि ऑडिओ तयार करण्यात येणार आहे. ज्या मुलांना हा कार्यक्रम ऐकता येणार नाही, त्यांना sagarwani.org या संकेतस्थळावर तो ऐकता आणि पाहता येणार आहे, असे बोधनकर यांनी सांगितले.

रेडिओ सागरमित्र या उपक्रमामुळे ‘पर्यावरण आणि कचरा व्यवस्थापन’ या विषयावर समाजात जागृती होण्यास मदत होणार असून, व्यवस्थापनात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना या रेडिओच्या माध्यमातून त्यांचे स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
- विनोद बोधनकर, समन्वयक, सागरमित्र अभियान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com