तांब्यावरील जीएसटी कमी करा 

तांब्यावरील जीएसटी कमी करा 

पुणे - तांब्यापासून तयार केलेल्या वस्तूंवर १२ टक्के वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) आकारला जात असताना तांबे धातूवर मात्र १८ टक्के कर आकारला जात आहे. त्यामुळे या धातूवरही १२ टक्के जीएसटी आकारला जावा, अशी मागणी ‘पूना कॉपर वाइंडिंग वायर मर्चंट असोसिएशन’च्या प्रतिनिधींनी केली.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ‘सकाळ’ने आयोजित केली होती. या वेळी भूषण भंडारी, सतीश जैन, संजय वोरा, लाल सखराणी, चंद्रकांत सादरिया, सतीश दलाल, सुनील शहा, शैलेश डावरे, अभिजित कर्नावट आणि व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळिया उपस्थित होते. 

वाहतूक कोंडी, त्यामुळे ग्राहकाचा जाणारा वेळ, मोठ्या वाहनांना शहरात बंदी आदी कारणांमुळे या क्षेत्रात टिकून राहण्याचे मोठे आव्हान शहरातील व्यवसायिकांसमोर असल्याचे संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले. वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, तसेच वाहने उभी करण्यासाठी सम-विषम तारखेनुसार नियोजन करण्याची मागणीही या वेळी त्यांनी केली.

शेती क्षेत्रात १९९०च्या दशकामध्ये तांबे धातूपासून तयार केलेल्या साहित्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे क्षेत्र वाढत गेले. तांबे आणि त्यासंबंधीचे साहित्य दमण येथून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येते. त्याचबरोबर पुण्यातही हे साहित्य येत असल्याचे या प्रतिनिधींनी  सांगितले. 

शहरात सुरवातीला या व्यवसाय शुक्रवार पेठेत सुरू झाला. कालांतराने आसपासच्या परिसरात तो वाढला.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे या क्षेत्रातील ७० व्यावसायिक 
संघटनेची स्थापना १९९४
संघटनेची सदस्य संख्या ७०
या क्षेत्राची वार्षिक उलाढाल 
४०० कोटी रुपयांची

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com