पुण्यात फेरनिवडणुकीची मागणी; EVMची अंत्ययात्रा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर झालेली आकेडवारी आणि मतमोजणीच्या दिवशी प्रसिद्ध झालेली आकडेवारी यामध्येही तफावत आढळत आहे

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा (EVM) गैरवापर केल्याचा आरोप करून भाजप वगळता सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम मशीनची मंगळवारी अंत्ययात्रा काढली. तसेच भाजप सरकारचा जाहीर निषेधही नोंदवित फेरनिवडणुकीची मागणी केली.

बालगंधर्व रंगमंदीर ते संभाजी उद्यानापर्यंत ही अंत्ययात्रा काढण्यात आली. पुणे महापालिकेला झालेले मतदान आणि न झालेले मतदान यामध्ये मेळ घालता आलेला नाही. महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर झालेली आकेडवारी आणि मतमोजणीच्या दिवशी प्रसिद्ध झालेली आकडेवारी यामध्येही तफावत आढळत आहे. 'पुण्यातील नगरसेवक ठरविण्याचे अधिकार नाही आता मतदाराला... तो फक्त खासदार बिल्डरला' अशा आशयाचे फलक घेऊन अनेकांनी ईव्हीएम मशीनमधील घोटाळ्याबाबत नाराजी व्यक्त केली.

मोर्चामध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, बंडू केमसे, नगरसेवक किशोर शिंदे, अस्मिता शिंदे, ऍड.रुपाली पाटील, संगिता तिकोने, अर्चना कांबळे, आशा साने, सुनिता साळुंके, बंडू नलावडे, चंद्रकांत अमराळे, श्‍वेता होनराव, दत्ता बहिरट, सचिन भगत, धनंजय जाधव यांच्यासह बहुसंख्येने वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या अंत्ययात्रेत सहभाग नोंदविला.
 

Web Title: reelection demand in pune, evm funeral protest against bjp govt