#ProtestForFood' : रिफेक्टरी'च्या प्रकरणाची होणार चौकशी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

पुणे : 'रिफेक्टरी' प्रकरणी आजपर्यंतचा घटनाक्रम पाहता चौकशी करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र जळगाव विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर. एस. माळी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असणार आहे. 

'रिफेक्टरी'तील अन्नाचा दर्जा, विद्यार्थी क्षमता, त्यानंतर रिकेक्टरीच्या सल्लागार समितीची  झालेली बैठक, त्यातून रिफेक्टरी'च्या नियमावलीत केलेला बदल, विद्यार्थ्यांचे आंदोलन, त्यातून झालेली धक्काबुक्की, विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला दिलेले निवेदन या सर्व प्रकाराची सविस्तर चौकशी समितीमार्फत करण्यात येणार आहे.

या समितीत डॉ.  प्रभाकर देसाई हे सचिव असतील, तर डॉ. अरविंद शाळीग्राम,डॉ. संजय चाकणे, डॉ. मनोहर जाधव आणि डॉ. दुर्गाम्बिनी पटेल हे सदस्य असणार आहेत. समितीचा अहवाल दहा दिवसांत येणे अपेक्षित आहे, अशी माहिती डॉ. देसाई यांनी दिली.

Web Title: refectory case will be investigated in pune university