ग्राहकाचे पैसे सव्याज परत करा;महारेराचा डीएसकेंना आदेश 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

पुणे - करारात ठरल्याप्रमाणे पैसे देऊनही सदनिकेचा ताबा न देणाऱ्या बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी संबंधित ग्राहकाला एका महिन्याच्या आत 1 कोटी 8 लाख रुपये परत करा, असे आदेश महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरीने (महारेरा) दिले आहेत. संबंधित रकमेवर फेब्रुवारी 2016 पासून 10. 65 टक्के दराने व्याज आणि दाव्याच्या खर्चापोटी 20 हजार रुपये देण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

डीएसके यांच्याविरोधात महारेराने दिलेला हा पहिलाच निकाल आहे. डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांच्यावर ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे, मुंबई, कोल्हापूर येथे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे डीएसके, त्यांची पत्नी व मुलगा यांच्यासह काही नातेवाईक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मुंबईतील शब्बीर शामसी आणि त्यांच्या पत्नी आसमा यांनी फुरसुंगी येथील डीएसके ड्रीम सिटीतील यमुना रेसिडेन्सीमध्ये बी विंगमधील 19 व्या मजल्यावरील 1 कोटी 49 लाख 84 हजार हजार रुपये किमतीची सदनिका बुक केली होती. त्याबाबतचा करार डीएसके आणि शामसी यांच्यात झाला होता. करारात 31 डिसेंबर 2017 पूर्वी सदनिका ताब्यात देण्यात येईल, तसेच सोसायटीमधील सर्व सुविधादेखील पुरविल्या जातील, असे नमूद होते. मात्र, बांधकाम बंद पडल्यामुळे शामसी यांनी ऍड. सुदीप केंजळकर आणि ऍड. नीलेश बोराटे यांच्यामार्फत महारेराकडे 31 जून रोजी याचिका दाखल केली होती. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी डीएसके आणि त्यांच्या कंपनीकडून कोणीही हजर राहिले नाही. तारखांबाबत त्यांना मेल आणि पत्रांद्वारे कळविण्यात आले होते. मात्र, त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद आला नाही. 

Web Title: Refund the money of the customer