‘पीएमआरडीए’चीही क्षेत्रीय कार्यालये

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

पुणे - शहराच्या हद्दीबाहेर घर खरेदी करावयाचे आहे. त्या बांधकामाला परवानगी घेतली आहे की नाही, याची माहिती घेण्यासाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यालयात जाऊन माहिती घेण्याची आता गरज राहणार नाही. कारण प्राधिकरणाकडून लवकरच पहिल्या टप्प्यात पाच ठिकाणी क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. 

या क्षेत्रीय कार्यालयांत बांधकाम परवानगीसह विविध कामे नागरिकांना मार्गी लावत येणार आहे. 

महापालिकेच्या हद्दीबाहेरच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे होऊ लागली आहेत; परंतु अशा बांधकामांना परवानगी आहे की नाही, याची पुरेशी कल्पना सर्वसामान्य नागरिकांना नसते. त्यामुळे अनेकांची फसवणूक होण्याची शक्‍यता असते. पीएमआरडीएने अधिकृत बांधकामे आणि अनधिकृत बांधकामांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे; परंतु त्याची कल्पना नागरिकांना नाही. त्यामुळे पीएमआरडीएने पहिल्या टप्प्यात कार्यक्षेत्राच्या हद्दीत पाच ठिकाणी क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे की नाही, येथपासून बांधकाम परवानगीसाठी अर्ज तसेच पीएमआरडीएच्या संबंधित जी कामे असतील, ती कामे या क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून केली जाणार आहेत. 

नागरिकांची कामे स्थानिक पातळीवर गतीने मार्गी लागावीत, पीएमआरडीएच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी जिल्ह्यात पाच ठिकाणी क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्याची योजना आहे. लवकरच ही कार्यालये सुरू होतील.
- किरण गित्ते,  आयुक्त, पीएमआरडीए
 
येथे होणार कार्यालय
खेड शिवापूर
चाकण
भुकूम 
तळेगाव 
वाघोली

Web Title: Regional Offices of PMRDA in pune