म्हाडाच्या घरांसाठी सोडत, ऑनलाइन नोंदणीला सुरवात 

म्हाडाच्या घरांसाठी सोडत, ऑनलाइन नोंदणीला सुरवात 

पुणे - पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) वतीने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत 812 घरांसाठी 19 डिसेंबर रोजी सोडत होणार आहे. त्यासाठी बुधवारपासून (ता.21) ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात झाली असून, 603 नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी केल्याची माहिती पुणे मंडळाचे मुख्याधिकारी अशोक पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. 

म्हाडाच्या सोडत काढण्यात येणाऱ्या एकूण घरांपैकी पुणे महापालिकेच्या हद्दीत 242 आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत 570 घरांचा समावेश आहे. घरांचे चटई क्षेत्रफळ 30 चौरस मीटर ते 60 चौरस मीटरपर्यंत असून, घरांच्या किंमती बाजारभावापेक्षा साधारण 30 टक्‍क्‍यांनी कमी आहेत. त्यानुसार घरांच्या मूळ किंमती 10 लाख 92 हजार रुपयांपासून 19 लाख 56 हजार रुपयांपर्यंत आहेत. याव्यतिरिक्‍त सोसायटी शुल्क, एमएसईबी, पार्किंगचे शुल्क विकसकाला अदा करावे लागणार आहे. सोडतीनंतर कागदपत्रे आणि दहा टक्के रक्कमदेखील ऑनलाइन भरावयाची आहे. संबंधित अर्जदारांना त्यांच्या मोबाईलवर संदेश, व्हॉटस्‌ऍप, ईमेलद्वारे माहिती कळविण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

म्हाडाची घरांची उपलब्धता 
पुणे महापालिकेच्या हद्दीतील महम्मदवाडी, धानोरी, पाषाण, बावधन, येवलेवाडी, आंबेगाव बुद्रूक. 
आणि पिंपरी-चिंचवडमधील वाकड, पुनावळे, पिंपळे सौदागर, ताथवडे, किवळे, रहाटणी, पिंपळे-निलख, बोऱ्हाडेवाडी, मोशी, चिखली, चोविसावाडी. 

म्हाडाच्या सोडतीचे वेळापत्रक - 
ऑनलाइन नोंदणी अर्जाची सुरवात - 21 नोव्हेंबर 2018 
ऑनलाइन नोंदणी अर्जाची शेवटची मुदत - 6 डिसेंबर 2018 सायंकाळी पाच वाजेपर्यंत 
बॅंकेत आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम भरण्याची मुदत - 7 डिसेंबर 2018 
ऑनलाइन पेंमेट करण्याची मुदत - 9 डिसेंबर 2018 
अल्पबचत भवन येथे सोडत - 19 डिसेंबर 2018 सकाळी 11 वाजता 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com