अकरावी प्रवेशाच्या ‘सीईटी’साठी अन्य मंडळाच्या ३६ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य मंडळातर्फे घेण्यात येणारी २०२१मधील दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली.
अकरावी प्रवेशासाठी 'सीईटी' देताय? जाणून घ्या कशी असेल परीक्षा
अकरावी प्रवेशासाठी 'सीईटी' देताय? जाणून घ्या कशी असेल परीक्षाsakal

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘सीईटी’साठी राज्य मंडळाच्या सुमारे १० लाख ९८ हजार ३१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहेत. तर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), आयसीएसई यांसह अन्य मंडळांच्या जवळपास ३६ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. (Pune News)

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य मंडळातर्फे घेण्यात येणारी २०२१मधील दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्यात आले. त्यानंतर अकरावी प्रवेशासाठी ‘सीईटी’ परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्य मंडळातर्फे विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध करून दिली होती.

अकरावी प्रवेशासाठी 'सीईटी' देताय? जाणून घ्या कशी असेल परीक्षा
शरद पवार बंगळुरुत; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा आला फोन; म्हणाले...

त्यासाठी दिलेल्या मुदतीत ११ लाख ९६ हजार ५३२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. त्यापैकी जवळपास ७६ हजार ८६ विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण आहेत. तर तब्बल २२ हजार १२८ विद्यार्थ्यांनी अर्ज भरून ‘सबमिट’ केलेला नाही. ‘सीईटी’ परीक्षेसाठी १० लाख ९८ हजार ३१८ विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती राज्य मंडळातर्फे देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com