तांत्रिक बिघाड झाल्याने दस्त नोंदणीचे काम 'स्लो'

Stamp
Stamp

पुणे : माहितीचे व्यवस्थापन करणाऱ्या यंत्रणेत (डेटा क्‍लाऊड इन्फ्रास्ट्रक्‍चर) बिघाड झाल्याने मंगळवारी राज्यातील दस्त नोंदणीच्या कामात अनेक अडथळे निर्माण झाले. दस्त नोंदणीचे कामाला विलंब होत असल्याने अनेक नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालय वर्षभरापूर्वी डेटा क्‍लाऊड सिस्टिमवर शिफ्ट झाले आहे. परंतु आज सकाळी या यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे दस्त नोंदणीचे काम स्लो झाल्याने राज्यातील अनेक ठिकाणच्या सब रजिस्टर कार्यालयांमध्ये नागरिकांना थांबून राहावे लागले. त्यांचा परिणाम दस्त नोंदणीवर देखील झाला. दरम्यान खात्याकडून संबंधित कंपन्यांकडे दुरुस्तीसाठी पाठपुरावा करण्यात येत असल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले. 

सदनिकेच्या दस्तनोंदणी आजचा मुर्हूत निवडला होता. परंतु सब रजिस्टर कार्यालयात आल्यानंतर तांत्रिक अडचणीमुळे नोंदणीस वेळ लागत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सकाळपासून कार्यालयात बसून आहे. - दस्त नोंदणीसाठी आलेला नागरिक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com