पुणे शहरातील रुग्णालयांत नियमित उपचार पुन्हा सुरू

पुणे शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आता कमी झाले आहे.
Surgery
SurgerySakal
Summary

पुणे शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आता कमी झाले आहे.

पुणे - शहरातील रुग्णालये (Hospital) पुन्हा एकदा रुग्णांनी (Patients) पूर्ण भरली असून, नियोजित शस्त्रक्रियांची (Surgery) प्रतीक्षा यादी आता वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदले. मात्र, कोरोना अद्यापही पूर्णतः संपलेला नाही. तो सध्या फक्त कमी झाला आहे. त्यामुळे मास्क, सोशल डिस्टन्सिंग अशा कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आता कमी झाले आहे. अतिदक्षता विभागातील गेल्या आठवड्यापासून कोरोनाचा एकही रुग्ण नाही. तसेच, कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या अत्यल्प आहे. त्याच वेळी शहरातील कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी लावलेले सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे शहर आणि परिसरातील दैनंदिन व्यवहार पूर्ववत होत आहेत. हे आशादायक चित्र आता दिसत आहे. त्याचा थेट परिणाम नियोजित शस्त्रक्रियांचे प्रमाण वेगाने वाढल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.

Surgery
पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या नऊशेच्या खाली

शहरात गेल्या दोन वर्षांपासून कोरोना उद्रेक सुरू आहे. पहिली लाट ओसरल्यानंतर मधल्या काही दिवसांसाठी गेल्या वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये नियोजित शस्त्रक्रिया सुरू झाल्या होत्या. मात्र, त्यानंतर लगेचच दुसऱ्या लाटेतील रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली. त्यामुळे नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या. आता तिसऱ्या लाटेनंतर पुन्हा शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत, असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले.

रूबी हॉल क्लिनिकचे डॉ. कपिल झिरपे म्हणाले, ‘आपण सगळे आता कोरोनाबरोबर रहायला शिकलो आहोत. कोणाला कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्या रुग्णाने चाचणी करावी. चाचणी पॉझिटिव्ह आल्यास योग्य उपचार आणि आराम करावा. ही आता नवीन जीवन पद्धती आहे. तसेच, शहरात आपले व्यवहार पूर्ववत होत आहेत. रुग्णालये हा देखिल त्यातील एक भाग आहे. रुग्णालयांमध्ये नियमित उपचार सुरू झाले आहेत.’

Surgery
पुणे : नदी काठ सुधार प्रकल्पावर उद्या बैठक

प्रोलाईफ कॅन्सर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे कर्करोग तज्ज्ञ डॉ. सुमीत शहा म्हणाले, ‘कर्करोगाच्या सर्व नियोजित शस्त्रक्रिया पूर्ववत सुरू झाल्या आहेत. रुग्णाची प्रयोगशाळेतील कोरोना निदान चाचणी करण्याचा कल कमी झाला आहे. क्लिनिकली व्यवस्थित रुग्ण असेल, तर त्याची शस्त्रक्रिया केली जाते.’

कोरोनामुळे शस्त्रक्रिया थांबल्या होत्या. नियोजित शस्त्रक्रियांसाठी रुग्ण पुढे येत नव्हते. आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने रुग्णांच्या शस्त्रक्रियांचे नियोजन सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काळजी काय घ्यावी?

  • कोरोनाची लक्षणे असल्यास चाचणी करा

  • पॉझिटिव्ह आल्यास विलगीकरणात जा

  • योग्य उपचार घ्या

  • आराम करा

  • मास्कचा नियमित वापर करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com