बारामतीबाबत बाळासाहेबांची भूमिका उद्धव ठाकरेंनीही जपली

मिलिंद संगई
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

राज्यातील बदलत्या सत्ता समीकरणात आता दोन भिन्न विचारधारा असलेले राष्ट्रवादी व शिवसेना हे पक्ष एकत्र येत आहेत. असे असले तरी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या मैत्रीचे किस्से सर्वश्रुतच आहेत.

बारामती : राज्यातील बदलत्या सत्ता समीकरणात आता दोन भिन्न विचारधारा असलेले राष्ट्रवादी व शिवसेना हे पक्ष एकत्र येत आहेत. असे असले तरी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या मैत्रीचे किस्से सर्वश्रुतच आहेत. राजकारणापलिकडची ती मैत्री होती आणि बाळासाहेबांनंतरही उध्दव ठाकरे यांनी शरद पवार व बारामतीच्या बाबतीत पवार कुटुंबियांना न दुखावण्याचीच भूमिका सतत घेतली होती. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शिवसेनेची स्थापना 1966 मध्ये झाली असली तरी बारामतीत शरद पवार यांच्या मूळ गावी म्हणजे काटेवाडी मध्ये 1986 मध्ये शिवसेनेची पहिली शाखा सुरु झाली. त्या नंतर शिवसेनेच्या तालुक्यात शाखाही निर्माण झाल्या, अनेकदा निवडणूकीत सेनेच्या उमेदवारांनी पवारांविरोधात दंडही थोपटले. मात्र आजवरच्या सर्व निवडणूकांमध्ये शिवसेनेच्या किंवा मित्रपक्षाच्या प्रचारासाठी ना बाळासाहेब ठाकरे कधी बारामती आले, ना उध्दव ठाकरे. युती असतानाही बारामतीला प्रचाराला यायच ठाकरे कुटुंबियांनी सातत्याने टाळले. 

Image result for sharad pawar and balasaheb thackeray

राष्ट्रवादीचे हे पाच नेते सांभाळणार चर्चेची पुढील सूत्रे

सन 2014 मध्ये विधानसभेच्या निवडणूकीत शिवसेनेच्या वतीने अॅड. राजेंद्र काळे हे अजित पवार यांच्या विरोधात बारामतीत उमेदवार होते. त्या वेळेस उध्दव ठाकरे हे बारामती विमानतळावर विमानाने आले, येथून हेलिकॉप्टरने फलटणला सभेसाठी निघून गेले. काळे यांनी त्या वेळेस त्यांना बारामतीत छोटी सभा घेण्याची विनंती केली होती, मात्र पूर्वनियोजित दौऱ्यामुळे त्यांनी बारामतीत त्या वेळेसही सभा टाळली होती. 

Image result for sharad pawar and balasaheb thackeray

मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, चिंता नको : शरद पवार

स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनीही वालचंदनगरला एक सभा घेतली होती, तेथून ते बारामतीमार्गेच पुण्याला गेले. मात्र त्या वेळेस कार्यकर्त्यांचा सत्कार स्विकारण्यासाठीही बाळासाहेब ठाकरे बारामतीत थांबलेले नव्हते, असा इतिहास आहे. सुप्रिया सुळे यांच्या पहिल्या खासदारकीच्या निवडणूकीत तर बाळासाहेबांची सुळे यांना पाठिंब्याची भूमिका जगजाहीरच होती. 
दोन भिन्न पक्ष असले तरी पवार व ठाकरे कुटुंबातील सौहार्दाचे वातावरण कायमच उत्तम होते, या नव्या युतीच्या निमित्ताने ते अधिक घट्ट होईल, अशी चिन्हे आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: relation between Uddhav Thackeray and Baramati after Balasaheb Thackeray