esakal | मोबाईलशी नातं जुळलं, आई-वडिलांशी तुटलं!
sakal

बोलून बातमी शोधा

 मोबाईलशी नातं जुळलं

मोबाईलशी नातं जुळलं, आई-वडिलांशी तुटलं!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : मुलांचं मोबाईलशी नातं जुळलं पण आई-वडिलांशी तुटलं अशी अवस्था ऑनलाइन शाळेमुळे झाली आहेत. मुलं आक्रस्ताळी होताहेत. ती ऐकत नाहीत. त्यामुळे कोरोनाच्या उद्रेकात मुलांचं संगोपन नेमकं करायचं तरी कसं असा प्रश्न पालकांना पडला.

हेही वाचा: सुखसागर नगर मधील महापालिकेचा दवाखाना रुग्णांसाठी ठरतोय संजीवनी

कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत असली तरीही संभाव्य तिसऱ्या लाटेची टांगती तलवार अद्यापही कायम आहे. त्यामुळे शाळा अद्यापही सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला नाही. त्यामुळे ऑनलाइन शाळा अद्यापही सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मुलांच्या संगोपनाचा प्रश्न गुंतागुंतीचा होत असल्याचा निष्कर्ष वेगवेगळ्या पालकांशी बोलल्यानंतर निघाला.

इयत्ता आठवीतील मुलाचे पालक रवींद्र जाधव म्हणाले, ‘‘ऑनलाइन शाळेमुळे मुलांच्या हातात मोबाईल, लॅपटॉप देणे अनिवार्य झाले. पण, शाळा सुरू होण्यापूर्वी आणि संपल्यानंतर किंवा काही वेळेला तर शाळा सुरू असतानाही मुलं नेमकं काय करतात, हे समजतं नाही. त्यामुळे आई-वडिलांशी असलेले नातं तुटून ते मोबाईलशी जोडलं गेलं, अशी अवस्था निर्माण झाली.’’

हेही वाचा: गुन्हेगाराचा ४ दिवसांपूर्वीच खून, मृतदेह शनिवारी कालव्यात सापडला

इयत्ता नववीच्या मुलीच्या पालक गीतांजली चव्हाण म्हणाल्या, ‘‘मुलं वह्यांवर लिहून घेण्यापेक्षा मोबाईलवर स्क्रीन शॉट काढून ठेवतात. त्यामुळे त्यांना नेमकं किती कळतंय, हे काही समजायला मार्ग नसतो. त्यातून काही विचारलं तर आक्रस्ताळेपणा ठरलेला असतो.’’

या बाबत राष्ट्रीय बालरोगतज्ज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग म्हणाले, ‘‘शाळेत जाणं जेवढं लांबवाल तेवढं शैक्षणिकदृष्ट्या मुलं मागे पडतील. त्यामुळे शाळा सुरू होणं महत्त्वाचं आहे. शाळा फार लांबल्यास शाळा न आवडणं, ती नकोशी वाटणं, त्याची भीती वाटणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात, असं शास्त्रीय लेखात म्हटलं आहे.’’

हेही वाचा: सिंहगड : 150 ते 200 फूट उंच कड्यावर पर्यटकांचे जीवघेणे स्टंट

शाळा सुरू कधी करायच्या हा निर्णय सरकारचा आहे. पण, आता शाळा सुरू झाल्या की लगेच गणवेश घालून शाळेत जायचं, अशी परिस्थिती आता राहिली नाही. त्यामुळे पालक आणि मुलं या दोघांना शाळेत जाण्यापूर्वी तयारी करायला वेळ द्यायला हवा, असे बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सने दिलेल्या अहवालात नमूद केले आहे. राज्यातील शाळा सुरू केल्या पाहिजे, असे वेगवेगळ्या तज्ज्ञांचे मत आहे. कारण, शाळा सुरू करायला फार वेळ लावल्यास मुलांची शैक्षणीक प्रगती मागे पडते. त्यांचे भाषा ज्ञान विकसित होण्यास मर्यादा पडतात. त्यामुळे आरोग्य विषयक दक्षता घेत टप्प्या-टप्‍प्याने शाळा सुरू केल्या पाहिजे, असेही टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: राणी सईबाईची समाधी पर्यटन स्थळ जाहीर करणार - रामराजे निंबाळकर

शाळा सुरू करण्यासाठी काय तयारी करावी?

 • मुलं एकत्र जेवायला बसतात ती ठिकाणं, मैदान आणि स्वच्छतागृहे येथे शाळेला दक्षता घ्यावी लागणार

 • शाळा सुटल्यावरही टप्प्या-टप्प्याने मुलांना वर्गातून सोडावं, एकदम सोडू नये

 • मुलांची प्रत्येक ठिकाणी होणारी गर्दी टाळायची

 • बसमधून किंवा रिक्षामधून होणारी मुलांची गर्दी कमी असावी

 • बसचालकांचे लसीकरण पूर्ण झाले पाहिजे.

हेही वाचा: पुण्याजवळील घाटमाथ्याला ‘ऑरेंज अलर्ट’

विद्यार्थ्यांपुढील समस्या काय आहेत?

 • शाळा बंद असलेल्या शालेय शिस्त राहिली नाही

 • शाळा लगेच पूर्ववत केल्यास मानसिक तयारीसाठी वेळ मिळणार नाही

 • अभ्यासाची सवय मोडली

शिक्षकांनी काय करावं?...

 • मुलांमध्ये मानसिक समस्या निर्माण झाली आहे का, याचे निरीक्षण करावे

 • अभ्यासात मागे पडली आहेत का, हे पाहावे

 • शाळा सुरू झाल्यावर लगेच अभ्यास करू नये

 • शाळेतील नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यास मुलांना मदत करावी.

loading image
go to top