कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या जनावरांची सुटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

राशीन : येथील आठवडे बाजारातून भिगवणकडे (जि. सोलापूर) कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा पिकअप विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्याने पकडून काल (मंगळवारी) दौंड पोलिसांच्या ताब्यात दिला. 

पिकअप जीप (एमएच 45 टी 3595) भिगवणमार्गे पुण्याकडे जात असताना येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते विठ्ठल शेगडे यांनी पाहिली. त्यांनी वाहनाचा पाठलाग केला. राजेगाव फार्म (ता. दौंड)जवळ शेगडे यांनी तो पकडला. त्या वेळी जिवे मारण्याची धमकी देऊन चालक तेथून पसार झाला.

त्यानंतर जनावरांसह भरलेली पिकअप जीप दौंड पोलिसांच्या स्वाधीन केली. पोलिस नाईक देवकाते व होमगार्ड कांबळे यांनी जनावरांसह वाहन पोलिस ठाण्यात हजर केले. त्यात दोन लाख किमतीचे वाहन व वीस हजार किमतीची जनावरे असा दोन लाख छत्तीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Release of animals taken for slaughter