विषारी घटकांपासून पाण्याची मुक्तता; आयसरचे संशोधन

जलशुद्धीकरणाची प्रक्रिया दाखवणारे चित्र.
जलशुद्धीकरणाची प्रक्रिया दाखवणारे चित्र.

पुणे - वाढत्या प्रदूषणामुळे दिवसेंदिवस जल-शुद्धीकरण यंत्रांची गरजही वाढत चालली आहे. घरगुती वापरासाठी विजेवर चालणारी जलशुद्धीकरण संयंत्रे (वॉटर प्युरिफायर) बाजारात मिळतात. परंतु, पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) शास्त्रज्ञांनी एक नवीन पदार्थ विकसित केला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ज्यामुळे पाण्याची शुद्धता तर वाढतेच, पण त्याचबरोबर विजेचीही बचत होते. विशेष म्हणजे अतिशय सूक्ष्म विषारी घटकांनाही हा पदार्थ विलग करतो. आयसरचे शास्त्रज्ञ प्रा. सुजित घोष यांच्या नेतृत्वाखाली पीएचडीचे विद्यार्थी सम्राट मोलिक, साहिल फजल, देबान्जन माहतो आणि पदवीचा विद्यार्थी सत्यम सौरभ यांचे हे संशोधन ‘एसीएस सेन्ट्रल सायन्सेस’ शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे. 

कोणत्या विषारी घटकांना विलग करते?
पाण्यात सहज मिसळणाऱ्या आर्सेनिक, सेलेनिअम, क्रोमियम अशा विषारी घटकांसह क्‍लोराईड, नायट्राईट, ब्रोमाईड आदी खनिजांची अनावश्‍यक मात्राही विलग करते. 

जलशुद्धीकरण संयंत्र काय करते?
कारखान्यांसह घरगुती वापराचे सांडपाणी जलस्त्रोतांमध्ये सोडण्यात येते. पर्यायाने विषारी रसायने, जिवाणू, कचरा, बुरशी आणि वायू पिण्याच्या पाण्यात मिसळतात. अशा अपायकारक घटकांना विलग करण्यासाठी हे संयंत्रे वापरण्यात येतात.

काय आहे नवीन संशोधन?
आयसरच्या शास्त्रज्ञांनी ‘स्पंज’सारखा एक पदार्थ विकसित केला आहे. ज्यामध्ये केटीऑनिक मेटल-ऑर्गेनिक पॉली हायड्रो आणि कोव्हॅलन्ट ऑर्गेनिक फ्रेमवर्क या दोन पदार्थांचे प्रकार वापरण्यात आले आहे. यांच्या छिद्रामध्ये अतिशय सूक्ष्म असलेले असेंद्रीय आणि विषारी घटक पकडून ठेवण्याची क्षमता आहे. एक ते ५० पार्टस पर मिलियन इतक्‍या सूक्ष्म आकाराच्या कणांचे विलगीकरण हा पदार्थ करतो.

पदार्थाचे वैशिष्ट्ये

  • कमी किमतीत आणि सहज उपलब्ध
  • विजेची गरज नाही
  •  सहज आणि सोप्या
  •  पद्धतीने वापरणे शक्‍य
  • अतिशय सूक्ष्म विषारी घटकांनाही विलग करतो

असे असावे शुद्ध पाणी

  • पीएच - ६.८ ते ८.५
  • पाण्यात मिसळेले पदार्थ (टीडीएस) - एका लिटरला ३०० मिलिग्रॅमपर्यंतचा उत्तम, तर ३०० ते ६०० दरम्यानचा टीडीएस हा समाधानकारक.
  • कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, क्‍लोराईड    
  • आदी खनिजांचा प्रमाणात समावेश गरजेचा

दूषित पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी विकसित करण्यात आलेला हा पदार्थ अधिक कार्यक्षम आहे. कमी किमतीत आणि पुनर्वापर करता येणारा हा पदार्थ जलशुद्धीकरणाचे भविष्य बदलेल, असा आम्हाला विश्‍वास आहे.
- प्रा. सुजित घोष, शास्त्रज्ञ, आयसर, पुणे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com