रिलायन्स इन्फ्रा कार्यालयाची तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

खेड शिवापूर - पुणे-सातारा रस्त्यावरील वेळु फाटा येथील सेवा रस्ता आणि उड्डाण पुलाच्या कामास विलंब होत असल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जांभुळवाडी (ता. हवेली) येथील रिलायन्स इन्फ्राच्या कार्यालयाची मंगळवारी (ता. २४) तोडफोड केली. त्यानंतर हे कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) वारजे येथील कार्यालयात गेले असता दोन दिवसांत या कामाबाबत बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर हे कार्यकर्ते स्वतःहून पोलिसांत हजर झाले.

वेळू फाटा येथील सेवा रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. सेवा रस्ता नसल्याने उड्डाण पुलाचे कामही रखडले आहे. त्यामुळे याठिकाणी अपघात आणि वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. सेवा रस्त्याच्या कामातील अडथळा दूर करून रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा केला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. 

भोरचे माजी उपसभापती अमोल पांगारे यांनी महिन्यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्राच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात आठ दिवसात वेळू येथील कामाला सुरवात करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र, महिना उलटून गेल्यानंतरही या कामाबाबत रिलायन्सने काहीच हालचाल केली नाही. त्यामुळे पांगारे आणि इतर कार्यकर्त्यांनी मंगळवारी जांभुळवाडी येथील रिलायन्स इन्फ्राच्या कार्यालयाची तोडफोड केली. तोडफोड सुरू होताच रिलायन्सच्या रंजन बोस आणि इतर अधिकाऱ्यांनी कार्यालयातून पळ काढला.

त्यानंतर वारजे येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात कार्यकर्ते गेले. वेळू नित्याची वाहतूक कोंडी व अपघातामुळे वेळू येथील काम लवकर सुरू करण्याची मागणी आम्ही केली. मात्र, त्याची दखल घेण्यात न आल्याने आम्ही तोडफोड करून निषेध व्यक्त केला असे पांगारे यांनी सांगितले.

Web Title: reliance infra office damage crime