IEPF : ‘आयईपीएफ’ एकात्मिक पोर्टलमुळे दिलासा

अर्थसंकल्पात घोषणा : दावा न केलेले १.१७ अब्ज शेअर, ‘डी-मॅट’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत
IEPF
IEPFsakal

- प्राची गावस्कर

पुणे : सरकारच्या ‘आयईपीएफए’ अर्थात गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाकडे जमा झालेल्या विना दावा शेअर आणि लाभांशाच्या मागणीच्या प्रक्रियेसाठी अर्थसंकल्पात एकात्मिक पोर्टल स्थापन करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.

या घोषणेने गुंतवणूकदार, शेअर दलाल आणि संबधित कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. आता शेअर आणि लाभांशाच्या पुर्नदाव्याची प्रक्रिया सुलभ आणि जलद होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यासाठी सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट स्थापन केले जाणार आहे. दरम्यान, कागदी स्वरुपातील शेअरचे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात म्हणजे डीमटेरिलायझेशन करून घेण्यासाठी आता शेअर बाजार नियामक ‘सेबी’ने ३१ मार्च २०२३ ही अंतिम मुदत जाहीर केली आहे.

लोकसभेत देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, शेअर गुंतवणूकदारांनी सात वर्षांच्या आत दावा न केलेले शेअर आणि लाभांश यांचे प्रमाण प्रचंड आहे. ‘आयईपीएफए’कडे नोव्हेंबर २०२२ पर्यंत जमा झालेल्या विनादावा शेअरची संख्या १.१७ अब्जांहून अधिक, तर लाभांशांची रक्कम ५६.८५ अब्ज रुपये इतकी प्रचंड आहे.

शेअरची संख्या २०१७-१८ मधील संख्येपेक्षा दुप्पट वाढली आहे. या प्राधिकरणाकडे दावा करून शेअर किंवा लाभांश घेता येतो, मात्र त्यासाठीची प्रक्रिया क्लिष्ट व वेळखाऊ असल्याने गुंतवणूकदार, संबधित कंपन्या, शेअर दलाल यांच्यामध्ये प्रचंड नाराजी होती. वर्षोनुवर्षे अशी अनेक प्रकरणे अडकून पडली आहेत.

त्यामुळे याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी वारंवार केली जात होती. त्याला आता यश आले आहे. दरम्यान, कागदी स्वरुपातील शेअरचे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात म्हणजे डीमटेरिलायझेशन करून घेण्यासाठी आता शेअर बाजार नियामक ‘सेबी’ने ३१ मार्च २०२३ ही अंतिम मुदत जाहीर केली आहे. यानंतर असे शेअर गोठवले (फ्रीज) जातील.

‘आयईपीएफ’मध्ये जमा झालेले शेअर

  • आता ३१ मार्च २०२३ अखेर डी-मॅट न झालेले शेअर ‘आयईपीएफ’मध्ये जमा

  • आधीच जमा झालेल्या विनादावा शेअरची संख्या १.१७ अब्जांहून अधिक

  • विनादावा लाभांश रक्कम ५६.८५ अब्ज रुपये

कागदी स्वरुपातील शेअर डी-मॅट करण्याची प्रक्रिया सुलभ आहे. यासाठी असे शेअर ज्यांच्याकडे आहेत, त्यांनी डी-मॅट खाते असेल तिथे त्याबाबत शेअरची माहिती देणे आवश्यक आहे. डी-मॅट खाते नसेल, तर ते उघडणे आवश्यक आहे. रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंटना शेअरसंबधित कागदपत्रे, पॅनक्रमांक, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक, बँक खाते तपशील आणि नामांकन आदी तपशील दिल्यानंतर ही प्रक्रिया सहजपणे पूर्ण होते.

- हितेन शहा, प्रमुख, हितेन शहा फायनान्शिअल सर्व्हिसेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com