पाडा थिएटर, बांधा मॉल ! 

theater
theater

पुणे : एक पडदा चित्रपटगृह पाडून त्या जागी नव्याने व्यापारी संकुल उभारणीची राज्यातील चित्रपटगृहचालकांची अनेक वर्षांपासूनची मागणी मंजूर करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. त्यामुळे चित्रपटगृहचालकांना दिलासा मिळणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर या बाबत रविवारी सायंकाळी पुण्यात या बाबतची घोषणा करण्याची शक्‍यता आहे. 

एक पडदा चित्रपटगृहचालकांना त्या जागेवर व्यापारी संकुल उभारायचे असेल तर, राज्य सरकारकडून परवानगी दिली जात नाही. चित्रपटगृहाचे अस्तित्त्व कायम ठेवून संकुल उभारण्यास सांगितले जाते. मल्टिफ्लेक्‍सच्या जमान्यात एकपडदा चित्रपटगृह हा पांढरा हत्ती झाला आहे. त्यामुळे आम्हाला पर्यायी व्यवसाय करणे क्रमप्राप्त झाले आहे, असे पूना एक्‍झिबिटर्स असोसिएशनचे सदस्य नानासाहेब कुदळे यांनी सांगितले.
 

दरम्यान, संघटनेच्या प्रतिनिधींनी जावडेकर यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाने त्यांच्या कानावर घातले आहे. त्यांनी या बाबत कायद्यात बदल करण्याची शिफारस राज्य सरकारला केली जाईल, अशी ग्वाही दिल्याचे समजते. देशात फक्त महाराष्ट्रातच एकपदडा चित्रपटगृहांचे अस्तित्त्व कायम ठेवण्याचा शासकीय आग्रह आहे. पुण्यात सिनेपोलिस मॉलमध्ये तर, 28 चित्रपटगृहे आहेत. मल्फ्लिेक्‍समुळे एकपदडा चित्रपटगृहचालकांचे कंबरडे मोडलेले असताना, जावडेकरांच्या शिफारसीमुळे त्यांना दिलासा मिळणार आहे. 

पुण्यात मोक्‍याच्या ठिकाणी 18 चित्रपटगृहे आहेत. प्रभात, नीलायम, लक्ष्मीनारायण, अलंकार, व्हिक्‍टरी, अलका, विजय आदी चित्रपटगृहांचा त्यात समावेश आहे. यातील अनेक चित्रपटगृहचालकांना आता व्यापारी संकुले उभारायची आहेत. परंतु, राज्य सरकारच्या आडकाठीमुळे ते अडचणीत आले होते. त्यात आता काही बदल होण्याची चिन्हे आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com