तीर्थक्षेत्र विकासाची कामे गतीने करा

Deepak-Mhaisekar
Deepak-Mhaisekar

पुणे - श्री क्षेत्र देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर, नेवासा पालखीतळ आदी तीर्थक्षेत्रांची विकासकामे गुणवत्तापूर्ण करण्याबरोबरच गतीने करावीत. या कामांच्या प्रगतीची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयास वेळेत सादर करावी. या कामांमध्ये हलगर्जीपणा होता कामा नये, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. 

विभागीय आयुक्त कार्यालयात श्री क्षेत्र देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर, नेवासा पालखीतळ विकास आराखडा कार्यकारी समितीची बैठक डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. 

जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, तीर्थक्षेत्र विकास विभागाचे विशेष अधिकारी उत्तम चव्हाण, मुख्य अभियंता सदाशिव साळुंके, पंढरपूर देवस्थानचे पदाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी आदी उपस्थित होते. 

सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभाग घेतला.

पंढरपूर नगर परिषद हद्दीच्या जागेतील मुरमीकरण, भीमा नदीवर काँक्रीट पूल बांधणे, भूसंपादनाच्या कामांना मंजुरी देणे, नेवासा विकास आराखड्याअंतर्गत प्राप्त प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देणे, आळंदी येथील रस्त्यांवर विद्युतीकरण करणे, पथदिवे बसविणे, देहू घनकचरा व्यवस्थापन, संत चोखामेळा समाधी आणि स्मारक आराखडा, विष्णुपद मंदिर परिसर सुधारणा, श्री संत नामदेव महाराज स्मारक बांधकाम, पालखीतळाच्या जागेचे भूसंपादन, पालखीतळ आणि पालखी मार्गांवरील स्वच्छतागृहांचे बांधकाम, पंढरपूर विकास आराखड्याअंतर्गत पाणीपुरवठा, भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, चंद्रभागा नदीच्या उजव्या तीरावरील घाटाचे बांधकाम, पूरसंरक्षणाचे काम, सासवड पालखी मुक्काम ठिकाणी पायाभूत सुविधा यांसह विविध विकासकामांबाबत बैठकीत चर्चा झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com