शिक्षण व्यवस्थेतील दोष दूर करा - पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

पुणे - ‘‘शिक्षकी पेशा हे अत्यंत पवित्र असे कार्य आहे. भावी पिढी सुसंस्कृत घडविण्याचे खरे कार्य शिक्षक करत असतात. दुर्दैवाने आज हे कार्य योग्य प्रकारे चालल्याचे दिसत नाही. समाजात अनिष्ट प्रवृत्ती वाढत आहेत. शिक्षण व्यवस्थेतील दोष दूर होऊन नवा समाज घडला पाहिजे,’’ असे मत माजी राष्ट्रपती डॉ. प्रतिभा पाटील यांनी व्यक्त केले.

सातव हायस्कूल माजी विद्यार्थी संघ आणि महाराष्ट्र आविष्कार सोशल ॲण्ड एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षिकांचा गौरव करण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या. पत्रकार संजय पवार, जयराम देसाई, प्रकाश चौधरी, डॉ. गंगाधर सातव, गंभीर मुंदीनकेरी, भास्करराव बाबर, एम. बी. शेख, सूर्यकांत कडाकणे, बाजीराव देशमुख, अनंत माने, डॉ. शोभा खंदोरे, डॉ. संतोष भोसले, गजानन जाधव उपस्थित होते.

डॉ. पाटील म्हणाल्या, ‘‘स्त्रिया या मातेच्या ममतेने शिक्षण देऊ शकतात. त्यामुळे शासन व संस्थाचालकांकडून शिक्षक भरती करताना महिलांना ७५ टक्के आरक्षण दिले पाहिजे.’’

Web Title: Remove defects in the system of education