'पुण्याचे नाव बदलून जिजापूर करा'

'पुण्याचे नाव बदलून जिजापूर करा'

पुणे- राज्य सरकारचा औरंगाबाद जिल्ह्याचे नाव संभाजीनगर व उस्मानाबाद जिल्ह्या'चे धाराशीव करण्याचा प्रस्ताव आहे, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. यावर पुणे शहर हे राष्ट्रमाता जिजाऊ मॉंसाहेब आणि छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या नावे ओळखले जाते. त्यामुळे पुण्याचे नाव बदलून
जिजापूर करण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी
यांच्याकडे सोमवारी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यासाठी संभाजी ब्रिगेडनं राज्य सरकारला पत्र लिहिलं आहे. पुण्याला जिजाऊंनी ओळख दिली. त्यामुळे शहराला त्यांचं नाव देण्यात यावं, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडनं घेतली आहे.

पुणे शहराला जिजाऊंचा वसा व वारसा आहे. हे शहर राष्ट्रमाता जिजाऊंनी सोन्याचा नांगर चालवून वसवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व खजिना खाली करून आपल्या 'शेतकऱ्यांना कर्ज मुक्त केले' त्यामुळे पुण्याचे नाव 'जिजापुर' केलेच पाहिजे. असाही उल्लेख संभाजी ब्रिगेडने दिलेल्या पत्रात केला आहे.

भाजप शिवरायांच्या आशीर्वादाने सत्तेत आले आहे. त्यामुळे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रींचं नाव पुणे शहराला द्यावं, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com