पुणे - सांगवीतील संत गोरोबा कुंभार उद्यानातील खेळण्यांची रंगरंगोटी

रमेश मोरे
बुधवार, 28 मार्च 2018

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी आनंद नगर येथील संत गोरोबा कुंभार उद्यानाचे रूपडे सध्या पालटले आहे. या जुन्या उद्यानांच्या डागडुजी व सुशोभिकरणामुळे उद्यानास संजिवनी मिळाली आहे. उद्यानाअंतर्गत दुरूस्त्यांचे काम काही महिन्यांपुर्वी करण्यात आले यात नविन स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सिमा भिंतीचे रंगकाम, कोनशिला, उद्यान नामफलकाची रंगरंगोटी, जुन्या फरशा बदलुन नव्याने केलेला वॉकींग ट्रॅक यामुळे उद्यानाचे रूप पालटले आहे.सध्या रंग उडालेल्या खेळण्यांचे रंगरंगोटी करण्याचे काम सुरू आहे.येत्या आठवड्यात हे काम पुर्ण हाेईल.असे उद्यान अधिकारी जे.व्ही.पटेल यांनी सांगितले.

नगरसेवक माई ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हर्षल ढोरे,संतोष कांबळे,शारदा सोनवणे यांनी पालिका प्रशासनाकडे सांगवीतील जुन्या उद्यानांच्या सुशोभिकरणासाठी प्रस्ताव देवुन पाठपुरावा केला होता. सांगवीतील या उद्यानाबरोबरच संत सावतामाळी उद्यानात मेघडंबरीच्या आकाराची विश्रांती व सावलीसाठी छत्री बसविण्यात आली आहे.याचबरोबर शिवसृष्टी उद्यानातील ट्रँकचे व ईतर दुरूस्तीचे काम सध्या सुरू असल्याचे उद्यान अधिकारी जे.व्ही.पटेल यांनी सांगीतले.

Web Title: renovation of sant goroba kumbhar garden in sangavi pune