शिवनेरीवर नव्याने बसविले शिवाई, मेणा आणि कुलुप दरवाजे

गणेश कोरे
शुक्रवार, 11 मे 2018

अंबरखाना येथील प्रस्तावित शिवकालीन शस्त्रास्त्र संग्रहालयासाठी ही वास्तु संरक्षित करण्यात येत आहे.

शिवनेरी : शिवनेरी संवर्धन आणि विकास प्रकल्पाअंतर्गत भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने संरक्षक सहाय्यक बी.बी.जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने शिवाई, मेणा आणि कुलुप हे तीन दरवाजे बसविण्यात आले आहेत.

shivneri

तसेच अंबरखाना येथील प्रस्तावित शिवकालीन शस्त्रास्त्र संग्रहालयासाठी ही वास्तु संरक्षित करण्यात येत आहे. ही वास्तु संरक्षित करण्याबराेबर गडावरील विविध दरवाजे आणि शिवाई देवी मंदिर जिर्णाेद्धरासाठी आवश्यक असणारी दर्जेदार सागवानी लाकडे जुन्नरचे तत्कालीन उपवनसंरक्षक अशाेककुमार खडसे यांनी बल्लारशा येथुन उपलब्ध करुन दिल्याने प्रकल्प प्रगतीपथावर असल्याचे बी.बी.जंगले यांनी सांगितले.

shivneri

तर शस्रास्त्र संग्रहालय उभारणीची मागणी जुन्नरच्या सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेने 2007 मध्ये शासनाकडे केली असून संस्थेकडुन पाठपुरावा सुरु आहे. तर केंद्र शासनाच्या विविध परवानग्यांसाठी खासदार शिवाजीराव आढळराव प्रयत्नशिल असून त्यांनी नुकतीच केंद्रीय सांस्क्रुतीक मंत्री डाॅ. महेश शर्मा यांची भेट घेऊन लेखी मागणी केली आहे. 

shivneri

Web Title: renovation of shivneri fort by archaeology department