भाडेकरारातील बनवेगिरीला लगाम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

ऑनलाइन भाडेकराराची ही सिस्टिम पूर्वी ओपन होती. त्यामुळे फसवणूक होत असल्याच्या काही तक्रारी आल्या होत्या. त्यांची दखल घेऊन लॉगिन मॉनिटरिंग सिस्टिम तयार केली आहे. त्यामुळे नोंदणी झालेल्या भाडेकराराची कॉपी करून घेणे शक्‍य होणार नाही. तसे केल्यास त्यांची माहिती लगेच मिळणार आहे.
- अनिल कवडे, नोंदणी महानिरीक्षक

पुणे - ऑनलाइन भाडेकरार करताना केंद्रचालकांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ‘लॉगिन मॉनिटरिंग सिस्टिम’ सुरू केली आहे. त्यामुळे भाडेकरार नोंदविताना जुन्या दस्ताचा क्रमांक टाकून भाडेकराराची प्रत देण्याच्या उद्योगाला आळा बसणार आहे. पर्यायाने फसवणूकही टळणार आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागाने भाडेकरार नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा नागरिकांना दिली आहे. त्यामुळे भाडेकरार नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्याची गरज नाही. ऑनलाइन भाडेकरार नोंदविताना मालक आणि भाडेकरू यांचे छायाचित्र काढण्यात येते. बायोमेट्रिक मशिनवर दोन्ही व्यक्तींच्या बोटांचे ठसे घेतले जातात. मात्र, काही केंद्रचालक जुन्याच भाडेकराराची कॉपी काढून घेतात. त्यावरील छायाचित्र काढून दुसऱ्या व्यक्तींची चिकटवतात. परंतु, त्यावरील व्यक्तीच्या बोटांचे ठसे बदलता येत नाहीत. तसेच, ते भाडेकरार दस्त बारकाईने पाहत नाहीत. आपल्या बोटांचे ठसे का घेतले नाहीत, असा प्रश्‍नदेखील त्यांच्या मनात उपस्थित होत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rent agreement issue