पुण्यातील २० हजार पथारी व्यवसायिकांचा भाडे व दंड होणार माफ

पुणे शहरातील २० हजार पथारी व्यावसायिकांचा एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीतील भाडे व दंड होणार माफ.
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSakal media

पुणे - हातावर पोट असणाऱ्या पथारी व्यावसायिकांचा रोजगार कडक लॉकडाऊनमुळे गेला, उत्पन्नाचे साधन गेल्याने उपासमारीची वेळ होती, तरीही प्रशासनाने या काळातील शुल्क भरावेच लागेल असा ताठर भूमिका घेतली होती. मात्र, वाहनतळ ठेकेदारांनाचे कोरोना काळातील भाडे माफ केले जात असताना पाथरी व्यावसायिकांना सूट न दिल्यास महापालिका प्रशासन व सत्ताधाऱ्याविरोधात तीव्र संताप व्यक्त होईल, हा प्रकार टाळण्यासाठी शहरातील २० हजार पथारी व्यावसायिकांचे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीतील भाडे व दंड अशी १२ कोटी १ लाख रुपयांचे रक्कम माफ करण्याचा निर्णय स्थायी समितीमध्ये घेण्यात आला.

आज (मंगळवारी) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील वाहनतळ ठेकेदारांचे १५ मार्च ते १५ सप्टेंबर या कालावधीतील भाडे माफ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने कार्यपत्रिकेवर आणला होता. त्यावर निर्णय झाल्यास सुमारे सव्वा कोटी रुपये भाडे माफ होणार होते. दरम्यान गेल्या काही महिन्यापासून अतिक्रमण विभागाने शहरातील पथारी व्यावसायिकांना लॉकडाऊन काळातील शुल्क व दंडाची रक्कम भरा अशी नोटीस बजावण्यात आली होती.

Pune Municipal Corporation
शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या २५५१ ठेवीदारांना ४९ कोटींच्या ठेवी वितरित

एकीकडे व्यवसाय बंद असताना हजारो रुपये भरा अन्यथा कारवाई केली जाईल अशी नोटीस येत असल्याने व्यावसायिकांचे धाबे दणाणले होते. यावर स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी हे शुल्क माफ करावे असा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यावेळी प्रशासन त्यास अनुकूल नव्हते. तसेच एकाला माफी दिली तर सर्वांना माफी द्यावे लागेल त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी देखील तयार नव्हते. त्यामुळे हा प्रस्ताव अभिप्राय पाठविण्यात आला होता.

आज आयत्यावेळी स्थायी समितीपुढे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन काळातील पथारी व्यावसायिकांचे भाडे शुल्क आणि दंडाची रक्कम माफ करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यामध्ये एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२१ पर्यंतचे भाडे व दंड याची रक्कम १९ कोटी ७६ लाख इतकी होती. मात्र, आॅक्टोबर ते डिसेंबर या काळातील शुल्क तसेच कोरोनाच्या काळात काही काळ व्यवसाय सुरू होते तेव्हाचे शुल्क माफ करता येणार नाही. त्यामुळे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२१ या कालावधीसाठीचे ८ कोटी ३२ लाख रुपये भाडे आणि ३ कोटी ६८ लाख रुपये दंड असे १२ कोटी एक लाख रुपये माफ करण्यास मान्यता देण्यात आली.

‘पथारी व्यावसायिकांचे १२ कोटी १ लाख रुपयांचे भाडे व दंड माफ केल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या काळात व्यवसाय करायला परवानगी देण्यात आली होती तो काळ वगळून उर्वरित काळासाठीचे भाडे शुल्क आणि दंड माफ केले आहे. याचा फायदा २० हजार पथारी व्यावसायिकांना होईल. वाहनतळ ठेकेदारांचे शुल्क माफ करण्याचा निर्णय अभ्यास करून घेतला जाणार आहे. ’’

- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com